भारताच्या उत्पादन क्षेत्रात मजबूत मागणी; पीएमआय निर्देशांकात सुधारणा
04-Nov-2024
Total Views |
मुंबई : भारताचा उत्पादन क्षेत्राचा विकास दर सप्टेंबरमधील आठ महिन्यांच्या नीचांकी दरावरून ऑक्टोबरमध्ये ५७.५ वर पोहोचला आहे. हंगामी समायोजित एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स(पीएमआय) सप्टेंबरमध्ये ५६.५ च्या आठ महिन्यांच्या नीचांकीवरून ऑक्टोबरमध्ये ५७.५ वर पोहोचला असून ऑपरेटिंग परिस्थितीत लक्षणीय आणि जलद सुधारणा दर्शवित आहे, अशी माहिती मासिक पाहणीत देण्यात आली.
पीएमआय अंतर्गत ५० च्या वर निर्देशांक म्हणजे उत्पादन क्रियाकलापांचा विस्तार तर ५० पेक्षा कमी आकडा घट दर्शवितो. भारताच्या कोर मॅन्युफॅक्चरिंग पीएमआयमध्ये ऑक्टोबरमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. कारण अर्थव्यवस्थेच्या ऑपरेटिंग परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर सुधारणा होत असून जलद वाढणारी नवीन ऑर्डर आणि आंतरराष्ट्रीय विक्री भारताच्या उत्पादन क्षेत्रासाठी मजबूत मागणी वाढ दर्शविते, असे एचएसबीसीचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ प्रांजुल भंडारी म्हणाले.
मागील काळापासून भारतीय वस्तूंच्या मागणीमुळे या कामगिरीला चालना मिळाली आहे. याव्यतिरिक्त, नवीन उत्पादन लाँच आणि यशस्वी मार्केटिंग उपक्रमांमुळे विक्री कामगिरी वाढण्यास मदत झाली. सप्टेंबरमधील दीड वर्षातील सर्वात कमी वाढीनंतर नवीन निर्यात ऑर्डरमध्येही मजबूत वाढ दिसून आली. तसेच, समितीच्या सदस्यांनी आशिया, युरोप, लॅटिन अमेरिका आणि यूएसमधून नवीन ऑर्डरमध्ये वाढ नोंदविली.