देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा भव्यदिव्य सोहळा ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता आझाद मैदानावर पार पडणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या सोहळ्यासाठी विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच या शपथविधीला दहा हजार लाडक्या बहिणी उपस्थित राहणार असून त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
Read More
(Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा भव्यदिव्य सोहळा ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता आझाद मैदानावर पार पडणार आहे. त्यांच्यासोबत अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर एकनाथ शिंदे हेदेखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आहे. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदासाठी पुन्हा एकदा निवड झाल्यानंतर त्यांनी एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
( Nayab Singh Saini )हरियाणामध्ये भाजपने खांदेपालट केला नसून नायबसिंह सैनी हेच नवे मुख्यमंत्री असणार आहेत. पंचकुला येथील भाजप कार्यालयात झालेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची एकमताने निवड करण्यात आली.
कर्नाटक येथे अखेर रंजक राजकीय घडामोडींनंतर मुख्य़मंत्री पदासाठी जेडीएसचे प्रमुख नेते हर्दनहळ्ळी देवेगौडा कुमारस्वामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यांनी राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेतली असून ते बुधवार २३ मे २०१८ रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
कर्नाटक येथे अतिशय रंजक पद्धतीने झालेल्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आता तेथील राजकीय परिस्थिती दर तासाला बदलत असल्याचे दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने कुमारस्वामी यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे, मात्र १५ दिवसात नाही तर शपथविधीच्या १४ तासांआधीच बहुमत सिद्ध करणार असल्याचे कुमारस्वामी यांनी जाीहर केले आहे.