स्थानिक पातळीवरील नवे संशोधन, संकल्पना राबविणाऱ्या होतकरू नवउद्योजकांना मदत करण्याच्या उद्देशाने विरार येथील कंटेंटस्टॅक कंपनीचे सहसंस्थापक निशांत पटेल यांनी विरार-हब इनक्यूबेटर हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.या परिसरातील उद्योजकतेला चालना देण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाद्वारे यशस्वी कंपन्यांसोबत भागीदारी करून तज्ज्ञांचे मार्गदर्शन,संसाधने आणि पायाभूत सुविधा आणि धोरणात्मक भागीदारीची संधी देऊन प्राथमिक अवस्थेतील स्टार्टअप्सना पाठबळ देण्याचे इनक्यूबेटरचे उद्दिष्ट आहे.
Read More