छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शिवशक 352 या तिथीनुसार साजरा केला जाणारा शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज सोमवार, दि. 9 जून रोजी किल्ले रायगडावर साजरा होणार आहे. हा सोहळा आपल्या डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यांतून हजारोंच्या संख्येने शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल झाले आहेत.
Read More
( Mass wedding ceremony of 125 brides and grooms concluded in Varanasi ) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी बुधवारी वाराणसी येथे आयोजित अक्षय्य कन्यादान महोत्सवात सहभागी होऊन सामाजिक समरसता आणि पारंपरिक मूल्यांचे उत्तम उदाहरण सादर केले. उच्चवर्णीय, दलित आणि मागासवर्गीय समाजांतील पार पडलेल्या 125 वर-वधूंच्या सामूहिक विवाह सोहळ्यात वडिलांच्या भूमिकेत येऊन एका जनजाती मुलीचे कन्यादान केल्याचे पाहायला मिळाले.
( Mahakumbhabhishek ceremony at Astik Samaj Temple Matunga ) आस्तिक समाज, माटुंगा, मुंबई - १०२ वर्षांहून अधिक परंपरा आणि भक्तीने समृद्ध असलेल्या माटुंगा येथील आस्तिक समाज मंदिरात भगवान श्रीराम आणि भगवान श्रीहनुमान यांचा महाकुंभाभिषेक सोहळा साजरा होणार आहे. दर १२ वर्षांनी एकदाच केला जाणारा हा पवित्र विधी मंदिरातील दैवी ऊर्जा आणि देवतांची शक्ती पुनर्जीवित करतो. यावर्षी हा सोहळा आमच्या परंपरेतील एक महत्त्वपूर्ण टप्पा साकारणार आहे.
( Minister Mangal Prabhat Lodha on inauguration ceremony of unnat marg ) निसर्गाचा समतोल राखत बृहन्मुंबई पालिकेने अतिशय प्रयत्नपूर्वक मलबार हिल येथे निसर्ग उन्नत मार्ग साकारला आहे. हे ठिकाण मुंबईकरांसह देशविदेशातील पर्यटकांसाठी एक उत्तम पर्यटनस्थळ ठरेल. हा प्रकल्प पर्यावरण रक्षण आणि प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगानेही जनजागृतीसाठी आदर्श ठरेल.
देवेंद्र फडणवीस ३.० मंत्रिमंडळात नागपूरातील राजभवन येथे दि : १५ डिसेंबर २०२४ रोजी महायुतीच्या आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. काही दिवसांआधी ५ डिसेंबर २०२४ रोजी राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली होती. अशातच आता महायुतीच्या एकूण ३९ आमदरांनी मंत्रिपदाची शपथ घेत मंत्रिपदाचा विस्तार करण्याचा निर्णय हाती घेतला आहे.
महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा "महाराष्ट्र भूषण" पुरस्कार, येत्या गुरूवारी दि. २२ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. तर मानाचा "गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार" ज्येष्ठ पार्श्र्वगायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.
कल्याण : कारागृहात ही चांगली माणसे असतात. रागाच्या भरात त्यांच्याकडून एखादे चुकीचे कृत्य झालेले असते. हे वास्तव विचारात घेऊन सध्या कारागृहाऐवजी आता सुधारगृह ही संकल्पना रुजू लागल्याचे मत कल्याण जिल्हा कारागृहाचे अधीक्षक राजाराम भोसले यांनी व्यक्त केले.
राज्यतील मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार ? या प्रश्नाला अखेर उत्तर मिळाले आहे. राज्यातील फडणवीस - शिंदे सरकरच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर मंगळवारी होतो आहे
आयपीएलचा २०२१ वर्षाचा सिझन ९ एप्रिलपासून सुरू झाला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर १४ व्या सिझनमध्ये स्वागत सोहळा (IPL Opening ceremony 2021 ) नसणार आहे. बीसीसीआयतर्फे पहिल्यांदाच काही विशेष व्यक्तींनाच सामना पाहण्यासाठी बोलवण्यात येणार आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (IPL 2021) या संघांमध्ये होणारा हा पहिला सामना चेन्नईतील चिदंबरम स्टेडिअममध्ये खेळवला जाणार आहे.