७१व्या मिस वर्ल्ड सोहळ्याच्या ग्रॅण्ड फिनालेचे आयोजन ९ मार्च रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर येथे भव्य सोहळ्यासह करण्यात येणार असल्याची घोषणा आज मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनने अधिकृतरित्या केली. या सोहळ्याचे जगभरात स्ट्रिमिंग व प्रसारण करण्यात येईल. १८ फेब्रवारी ते ९ मार्च २०२४ दरम्यान या सोहळ्याचे आयोजन देशभरातील विविध ठिकाणी करण्यात येणार आहे.
Read More
तुमच्या मते सुंदरतेची व्याख्या काय?" असा प्रश्न आपल्याला सहज कुणी विचारला तर एखादे लहान मूलही तेच उत्तर देईल आणि वयोवृद्ध व्यक्तीकडेही त्याच पठडीतले उत्तर तयार असेल. 'सुंदर' म्हणजे दिसायला सुंदर. रंग गोरापान" सुबक शरीरयष्टी" शोभेल अशी उंची" आकर्षक व्यक्तिमत्त्व आदींची मापने मग दिली जातील. 'माणूस मनाने सुंदर असला की तो सुंदर' अशीही बौद्धिक उत्तरे देणारे दिसतील. या सर्व पूर्वग्रहदूषिततेला चपराक देणारा प्रसंग जागतिक पातळीवरील मंचावर नुकताच घडला. इतक्या मोठ्या मंचावर अशी ऐतिहासिक घटना घडली की" ज्यामुळे अनेक व्य
मानुषी छिल्लर ही आत्तापर्यंत सर्वांना मिस वर्ल्ड म्हणून माहित असेलच. परंतु प्रेक्षकांच्या मनात आपली आणखी एक ओळख निर्माण करण्यासाठी ती आता सज्ज झाली आहे. मानुषी आता लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
मिस वर्ल्ड’ या ‘ब्युटी पेजंट’मध्ये आता तृतीयपंथीही अधिकृतपणे सहभागी होऊ शकतात, असा निर्णय ‘मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशन’च्या अध्यक्षा ज्युलिया मोर्ले यांनी घेतला. स्पेनची अँजेला पॉन्स ही ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत सहभागी होणारी पहिली तृतीयपंथी होती. त्यापूर्वी २०१२ मध्ये कॅनडाच्या जेना तालाकोवाने ‘मिस वर्ल्ड’मध्ये भाग घेतला होता, पण तिला अपात्र ठरवले गेले.