मराठीत पाठ्या न लावल्याने नवी मुंबईत मनसे आक्रमक झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली डेडलाईन संपून आस्थापनावर मराठीत पाठ्या लागल्या नसल्याने मनसेने आक्रमक भुमिका घेतली आहे. नवी मुंबईच्या नेक्सेस ग्रँड सेंटर मॉल आस्थापनेवरील इंग्रजीत लावलेल्या पाट्या या मराठी करण्या साठी मनसे कार्यकर्त्यांनी मॉल प्रशासनाला घेरावा घाचला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात मॉलच्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Read More
दुकानांवरील मराठी पाट्यांच्या मुद्यावरून मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. जर दुकानावर मराठी पाट्या लावल्या नाहीत तर, खळखट्याक करण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. तसेच सोलापूर, दहिसर आणि ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी कारवाईही सुरु केली आहे.
पुढील दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने व्यापाऱ्यांना दिले आहेत. मराठी पाट्यांच्या सक्तीबाबत व्यापाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आता कोर्टाने व्यापाऱ्यांना दोन महिन्यात मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत.