ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडीयमचे रुपडे पालटले असले तरी स्टेडीयममधील व्यावसायिक गाळ्यांमध्ये अनेक संस्था, आस्थापना आणि वृत्तपत्रांच्या कार्यालयांनी ठाण मांडले आहे. या गाळे धारकांनी गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेला भाडेच अदा केले नसल्याचे समोर आले आहे.
Read More
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील १० खेळाडूंनी क्रिडा क्षेत्रातील मानाचा असा शिवछत्रपती पुरस्कार मिळवून ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात विजेत्या खेळाडूंचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे म्हणाले, ठाणे जिल्ह्याची परंपरा आहे की,येथील खेळाडूंनी जिल्ह्याचे नाव राज्य, देश, आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावले आहे. आम्हा सर्वांना तुमचा अभिमान वाटतो. तुम्ही असेच खेळत राहा आणि जिल्ह्याचा नावलौकिक वाढवा, यामुळे आमचाही उत्साह वाढेल, असे कौतुकोद्वार जिल्हा
घरात पुजेकरीता स्टोव्हवर धुप पेटवताना स्टोव्हचा भडका उडुन लागलेल्या आगीमुळे एक महिला होरपळल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दादोजी कोंडदेव स्टेडीयमसमोरील नागसेन नगरमधील ठाणे महापालिका चाळीत घडली. रेश्मा प्रविण जाधव (४१) असे होरपळलेल्या महिलेचे नाव असुन त्यांच्या हाताला व चेहर्याला जखम झाली आहे. त्यांना नजीकच्या दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले आहे. दरम्यान, घटनास्थळी लागलेली आग आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी ४० मिनिटात विझवल्यान सुदैवाने अनर्थ टळला.
८ तारखेपासून सुरु होणार देशभरात प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या विजय हजारे करंडक स्पर्धेचे सामने