ठाण्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी पहाटेपासुन चांगलेच धुमशान मारले. तलावांचे शहर असलेल्या ठाणे शहरातील तलाव भरले असुन अनेक सखल भागात पाण्याचे तळे साचल्याने जनजीवन विस्कळित झाले.
Read More
राज्य सरकारचे मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरु असतानाच ठाण्यातही पावसाचे धुवाँधार 'अधिवेशन' सुरु आहे.बुधवारी सकाळपासुनच सोसाट्याच्या वाऱ्यासह सुरु झालेल्या पावसाने ठाणे शहरात पाणी तुंबण्यासोबतच वृक्षांची पडझड होऊन वाहनांची वाताहत उडाली. शहरात आठ ठिकाणी पाणी तुंबल्याने वाहतुक मंदावली होती. बुधवारी दिवसभरात ठामपा आपत्कालीन कक्षाकडे १४० मि. मीटर पावसाची नोंद झाली. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाल्याने गुरुवारी शाळा - महाविद्यालयाना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.
‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे मुंबईकर ‘नेमेचि होते मुंबईची तुंबई’ असे म्हणत कसेबसे पावसाळ्यांत अक्षरश: ‘जीवाची मुंबई’ करतात. पालिकेचेही दरवर्षीप्रमाणे १०० टक्के नालेसफाईचे दावे पहिल्या पावसात धुवून निघतात. यंदाही मुंबईची परिस्थिती काही वेगळी नाहीच. त्याचाच या लेखातून घेतलेला हा आढावा...
यंदाच्या मौसमामध्ये राज्यात पावसाने अत्यंत दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे यंदा राज्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
गेल्या २४ तासांमध्ये संपूर्ण भारतामध्ये मेघालयातील चेरापुंजीनंतर मुंबईमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुंबईमध्ये गेल्या २४ तासांमध्ये तब्बल १३१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.