ज्युनियर एनटीआरची प्रमुख भूमिका असणारा 'देवरा १' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने सैफ अली खान आणि जान्हवी कपूर यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. तसेच, या चित्रपटात मुरली शर्मा, प्रकाश राज या कलाकारांच्याी मुख्य भूमिका आहेत. प्रदर्शनापुर्वीच चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधलं होतं. ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरच्या गाण्यातील त्यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक होते. पण तुम्हाला माहित आहे काचित्रपटात जान्हवी ज्युनियर एनटीआरसोबत मुख्य
Read More
दाक्षिणात्य अभिनेता ज्युनियर एनटीआरच्या 'देवरा १' चित्रपटाने प्रदर्शनापुर्वीच तुफान कमाई केली आहे. या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच करोडोंची कमाई केली आहे. २०२४ मधील एनटीआर आणि जान्हवी कपूरचा 'देवरा १' हा चित्रपट बहुप्रतिक्षित आहे. या चित्रपटाची, गाण्यांची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे. शिवाय या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अधिकच चर्चा सुरु झाली होती. अशातच आता चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी चित्रपट पाहण्यासाठी चाहते मोठ्या प्रमाणात अॅडव्हान्स बुकिंग क
'धडक गर्ल' जान्हवी कपूर आता गुंजन सक्सेना या 'कारगिल गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या शौर्यवतीवर आधारित जीवनपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाली आहे. नुकतीच या चित्रपटामध्ये जान्हवी साकारत असलेल्या गुंजन सक्सेना यांच्या भूमिकेची काही पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
करन जोहर निर्मित 'कलंक' या मल्टी स्टारर आणि बिग बजेट चित्रपटानंतर 'तख्त' हा तसाच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दरम्यान या चित्रपटातील पात्रांविषयी काही खुलासे करण्यात आले आहेत अशी चर्चा सध्या सुरु आहे.
अनिल कपूर, करीन कपूर खान, रणवीर सिंह, आलिया भट, विकी कौशल, भूमी पेडणेकर आणि जान्हवी कपूर अशी तगडी स्टारकास्ट घेऊन आपल्या भेटीस येणाऱ्या 'तक्त' या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अनावधानाने करन जोहर यांच्या इंस्टाग्रामवरील स्टेटसमधून आज उघड झाली आहे.
श्रीदेवी यांच्या निधनाने संपूर्ण देशाला हादरवून टाकले होते. मात्र याचा सगळ्यात मोठा धक्का बसला तो म्हणजे त्यांच्या पती आणि त्यांच्या कुटुंबियांना. श्रीदेवी यांच्या निधनानतंर त्यांना प्रसिद्ध आयफा अवॉर्ड्स मध्ये सर्वोत्कृष्ट नायिकेचा पुरस्कार 'मॉम' या चित्रपटासाठी मिळाला. हा पुरस्कार घेण्यासाठी मंचावर आल्यानंतर श्रीदेवी यांच्या आठवणीत त्यांचे पती बोनी कपूर यांना अश्रु अनावर झाले.
गेल्या काही दिवसांपासून धडक हा चित्रपट चर्चेत आहे. मराठमोळ्या सैराटचा हिंदी रीमेक असल्याने धडकविषयी मराठी प्रेक्षकांच्या मनात देखील खूप उत्सुकता आहे. आज काही वेळापूर्वीच धडक या चित्रपटातील प्रमुख गाणं "धडक है ना.." प्रदर्शित करण्यात आलं. या गाण्याला संगीतल सैराटच्याच अजय अतुल यांनी दिलं आहे, तर गाण्याला आवाज दिला आहे, प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल आणि अजय गोगावले यांनी. एकूण गाणं सुंदर असलं तरी देखील 'सैराट झालं जी' ची सर या गाण्याला आलेली नाही. त्यामुळे कदाचित प्रेक्षकांचा भ्रम निरास होऊ शकतो.