रोगप्रतिकारक शक्तीचा अभ्यास करताना केवळ शारीरिक पातळीवर बदल घडवणे उपयुक्त नसते, तर त्याचबरोबर मानसिक पातळीवरही सकारात्मक बदल घडवणे हे अत्यंत आवश्यक असते. मानसिक पातळीवर पाहता, रोगप्रतिकारक शक्तीचा माणसाच्या भावनात्मकेतशी थेट संबंध असतो. भावनिक ताणतणाव हे शरीरातील संप्रेरकांना बाधा पोहोचवत असतात वा संप्रेरकांमधील असंतुलन शेवटी आजाराला कारणीभूत ठरत असते. जसे आपण नेहमी म्हणतो तसेच मन हे अतिशय खोलपर्यंत कार्यरत असते. परंतु मन, अहंकार, बुद्धी, चित्त, अंत:करण अशा पातळ्यांवर या मनाचा अभ्यास करावा लागतो.
Read More