"ज्ञानवापी ही केस आमच्यासाठी भक्तीचा एक मार्ग आहे. विरोधक त्यांची वास्तू सोडणार नाही, आपल्याला ते हिसकावूनही घ्यायचे नाही. अक्रांतांनी ज्या ज्या मंदिरांवर आक्रमणे केली ते प्रत्येक मंदिर आम्ही न्यायालयीन लढ्यातून सोडवणारच!", असा ठाम विश्वास हिंदू मंदिरांसाठी कायदेशीर संघर्ष करणारे वरिष्ठ अधिवक्ता अॅड. विष्णू शंकर जैन यांनी व्यक्त केला.
Read More
सर्व पुरावे आणि वस्तुस्थिती हिंदूंच्या बाजूने स्पष्टपणे दिसत असतानाही, काशी विश्वेश्वर मंदिराला मुस्लिमांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी, हिंदू समाजाला न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले. हा हिंदूंच्या सार्वजनिक जीवनातील शुचितेच्या संकल्पनांचा सर्वोच्च आविष्कारच! अयोध्येप्रमाणेच आता काशी विश्वेवराला मुक्त करण्यासाठी, हिंदू समाजाकडून मर्यादापुरुषोत्तम श्रीरामांच्या तत्त्वांचाच आदर्श बाणविला जात आहे, हे नक्की.
ज्ञानवापी परिसराच्या मालकी हक्कावरुन अलाहाबाद उच्च न्यायालयाने दि. १९ डिसेंबर, मंगळवारी आपल्या आदेशातून मुस्लिम पक्षाला मोठा धक्का दिला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने १९९१ च्या खटल्याच्या सुनावणीस मान्यता दिली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळली आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वाराणसीतील ज्ञानवापी मशीद नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, यात त्रिशूलसह हिंदू धर्माची इतर चिन्हे आहेत. त्यामुळे या संकुलाला मशीद म्हणता येणार नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, “ज्ञानवापीमध्ये हिंदू देवी-देवतांच्या मुर्ती आहेत. ज्ञानवापीला मशीद म्हटले तर वाद होईल.
नाशिक : भारतीय संत समितीचे अध्यक्ष अनिकेत शास्त्री महाराज यांनी झानवापी प्रमाणेच त्र्यंबकेश्वरच्या दर्ग्याचा सर्व्हे करण्यात यावा अशी मागणी पुरातत्व खात्याकडे केली आहे. बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील हजरत पीर गुलाब सय्यद शाहवली बाबा दर्गा याची पुरातत्व विभागाने सर्व्हे करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे देवदेवतांची चित्रे कोरली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे ही जागा नाथ संप्रदायाची असल्याचा दावा अनिकेतशास्त्री मह्राराजांनी यावेळी केला आहे.
नवी दिल्ली : ज्ञानवापी मशीद परिसराच्या सर्वेक्षणादरम्यान सापडलेली वस्तू शिवलिंग आहे की कारंजी, तपासण्यासाठी शास्त्रीय चाचणीस परवानगी देणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी तूर्तास स्थगित केले आहेत.
वाराणसी जिल्हा न्यायालयात बुधवारी ज्ञानवापी मशीद प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. हिंदू आणि मुस्लीम दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे.