इस्रायलवर ‘हमास’ या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यानंतर उफाळलेल्या संघर्षात तेलाचे दर कडाडले आहेत. इस्रायलने हे युद्धच असल्याचे जाहीर करत ‘हमास’चा नायनाट करण्यासाठी गाझा पट्टी अक्षरशः नेस्तनाबूत करण्याचा विडा उचलला आहे. ‘हमास’ला मदत करणार्या इराणपर्यंत या संघर्षाची व्याप्ती वाढली, तर मात्र पुरवठ्याअभावी संपूर्ण जगाला इंधनाची कमतरता जाणवण्याची भीती व्यक्त होत आहे.
Read More