"भाजप विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने पाठवलेली नोटीस बेकादेशीर आहे.", असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (दि. १३ जून) पत्रकारांना संबोधताना केले. विरोधकांचे हे षडयंत्र असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. यावर "नोटीस दिल्लीच्या गांधींना...कळा मुंबईच्या लाचारांना...", असे म्हणत भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राऊतांवर चांगलाच पलटवार केला आहे.
Read More