तात्याराव सावरकरांच्या पत्नी यमुनाबाई उर्फ माई यांचे माहेर त्र्यंबकेश्वरच्या जवळ असलेल्या जव्हारचे. त्यांचे वडील रामचंद्र उर्फ भाऊराव चिपळूणकर हे जव्हार संस्थानचे दिवाण होते. ते अतिशय श्रीमंत होते. तात्यारावांचे आजोळ कोठूरचे. त्यांच्या मामांचे नाव गोविंद मनोहर. तात्यांचे आई-वडील खूप लवकर मृत्यू पावले असल्याने हे मामाच सावरकर कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती होती. त्यांनी एके दिवशी अचानकपणे जाहीर केले की, “मी तात्याचे लग्न यमुना चिपळूणकरशी नक्की केले आहे.” थोड्या चर्चेनंतरतात्यांनीही या विवाहाला संमती दिली आणि मा
Read More
माणसं, त्यांची जीवनपद्धती, त्यावर आधारलेली विचारपद्धती एका समूहापुरती न राहता गावं देश जोडत गेली. वाचनसंस्कृतीचा वारसा आपल्याला लाभला आहेच, तो समृद्ध केला अनुवादित साहित्याने. भाषांतरानेही जागतिकीकरण होतं. मूल्यांची, विचारांची देवाणघेवाण होते. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून जेष्ठ अनुवादक लीना सोहोनी यांच्याशी केलेली ही खास बातचीत.
“तुम्ही पर्यावरणमंत्री आहात, कोकणात काय चालले आहे पाहिले का? काय केले तुम्ही कोकणासाठी,” असा प्रश्नांचा भडिमार संतप्त चिपळूणकरांनी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंवर गुरुवार, दि. २९ जुलै रोजी केला.पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे गुरुवारी पूरग्रस्त चिपळूण दौर्यावर पाहणीसाठी गेले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांना स्थानिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. अनेकदा नैसर्गिक संकट आल्यानंतरही शासनाकडून पुरेशी मदत न मिळाल्याने कोकणवासीयांनी संतप्त होत आदित्य ठाकरेंना धारेवर धरले.