मोहरममध्ये झारखंडमधील पलामू येथून राष्ट्रध्वजाची छेडछाड झाल्याची घटना समोर आली आहे. मोहरमच्या मिरवणुकीत तिरंग्यात अशोक चक्राऐवजी उर्दूमध्ये काहीतरी लिहून त्यात तलवारीचे चित्र छापण्यात आल्याचा आरोप आहे. काही वेळातच हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. आरोपींवर कारवाईची मागणी होत आहे. याप्रकरणी तपास करून कारवाई करण्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ही घटना दि. २८ जुलै रोजी घडली.
Read More