उत्तर प्रदेश : केंद्रीय लोकसेवा आयोगाने दि. २३ मे रोजी नागरी सेवा परीक्षांचे निकाल जाहीर केले. देशात जवळपास हजारांहून अधिक परीक्षार्थी या परीक्षेला बसले होते. उत्तर प्रदेशातील सूरज तिवारी हादेखील त्यापैकीच एक. उत्तर प्रदेशातील मैनपूरी येथील रहिवासी आहे. सूरजने युपीएससी परीक्षेत देशात ९१७ वा क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे त्याने हे यश आपल्या पहिल्या प्रयत्नातच मिळविले आहे. सूरज हा दिव्यांग असून त्याला दोन पाय नाहीत, त्याला एक हात नाही, मात्र त्याने मेहनत करत आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे यश संपादित केले आहे.
Read More
केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससीच्या माध्यामातून देशातील प्रशासकीय अधिकार्यांeची नियुक्ती होत असते. राज्यातील अनेक मराठी तरुण ही परीक्षा देत असतात.
वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी वडिलांचे छत्र हरपलेल्या हर्षल भोसलेने हलाखीच्या परिस्थितीवर मात करत यशोशिखर गाठले. त्याच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा हा लेख...