भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र पवार फाऊंडेशनच्या वतीने कल्याण मध्ये दोन दिवसीय शासकीय योजनांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, मतदार नोंदणी अभियान, आयुष्यमान भारत कार्ड या योजनांचा कल्याणकर नागरिकांना लाभ घेता येणार आहे. गुरुवारी १ ऑगस्ट व शुक्रवारी २ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० ते रात्री ८ वाजेपर्यंत कल्याण पश्चिमेतील भोईरवाडी येथील श्री सिद्धीविनायक हॉल याठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी करोना संसर्गामुळे माता-पित्यांचे छत्र गमाविलेल्या मुला-मुलींना ‘पीएम केअर फॉर चिल्ड्रेन’ योजनेअंतर्गत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आर्थिक मदत जारी केली. यावेळी केंद्रीय मंत्री आणि राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमात सहभागी झाले होते.