अमरावतीला मूर्तिकार बंधू आहेत. त्यांनी अंतर्गत गृहसजावटीमध्ये अतुलनीय काम तर सुरू ठेवले आहेच, पण त्यांच्या मूर्तिकामातील कसब-रंगलेपनातील कौशल्ये पाहता, समस्त मूर्तिकला प्रकारावर विजय प्राप्त केलेला आपल्या ध्यानी येते.अतुल आणि विजय जिराफे हे कलाकार बंधू जणू नाण्याच्या दोन बाजू. त्यांचं त्यांच्या व्यवसायातील नाणंच खणखणीत! मूर्तिकला आणि रंगलेपनातील अद्भुत कसब पाहता अल्पावधीत जवळपास जगभर त्यांची मूर्तिकला पोहोचली, यावरून त्यांच्या कामातील दर्जा-प्रामाणिकपणा आणि एकमेवत्व (युनिकनेस) ध्यानी येतो.
Read More