presented

“तुम्ही बोलण्यातली सभ्यता…”, अविनाश नारकरांनी नेटकऱ्याला फटकारले

कलाकारांना सोशल मिडियावर कोणत्याही कारणाने ट्रोल करणं सुरुच असतं. कधी त्यांच्या राजकीय, सामाजिक मतांवरुन तर कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींवरुन त्यांना कायम टार्गेट केलं जातं. सध्या अभिनेते अविनाश नारकर यांना नेटकऱ्याने त्यांच्या डान्सवरुन ट्रोल केले आहे. अविनाश नारकर त्यांच्या पत्नी ऐश्वर्या नारकर सोबत सोशल मीडियावरील ट्रेण्ड फॉलो करताना दिसत असतात. नुकताच अविनाश यांनी एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला होता. ज्यावर एका नेटकऱ्याने असभ्य भाषेत प्रतिक्रिया दिली असून नारकरांनी सडेतोड उत्तर दिलं.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121