अविनाश नारकरांची ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

    28-Apr-2024
Total Views |

avinash  
 
 
मुंबई : झी मराठी, कलर्स मराठी या वाहिन्यांवरील अनेक मालिका निरोप घेत असून त्यात आता आणखी एका वाहिनीवरील मालिका संपणार आहे. मालिका विश्व आणि सोशल मिडियावर सक्रिय असणाऱ्या अविनाश नारकर (Avinash Narkar) यांची मालिका ‘कन्यादान’ इक्झिट (Avinash Narkar) घेणार आहे.
 
अविनाश नारकर सोशल मिडियावर चांगलेच सक्रिय असतात. इन्स्टाग्रामवर अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांचे रिल्स तुफान व्हायरल होत असतात. तर दुसरीकडे त्यांची सन मराठी वाहिनीवर सुरु असणारी कन्यादान ही मालिका लवकरच निरोप घेणार आहे.
 

avinash  
 
‘सन मराठी’ वाहिनीवर २०२१ पासून सुरु असमारी अविनाश यांची ‘कन्यादान’ मालिका प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळवत होती. या मालिकेत अविनाश यांच्यासह अनिषा सबनीस, संग्राम साळवी, अमृता बने, स्मितल हळदणकर, चेतन गुरव, शुभंकर एकबोटे हे प्रमुख कलाकार आहेत.
 
सन मराठी वाहिनीवर गेली अडीच वर्ष ‘कन्यादान’ मालिका सुरु असून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. पण आता मालिका लवकरच संपणार असून शुटींगही पुर्ण झाले आहे. पण आता कन्यादान मालिकेच्या वेळेत नवी कोणती मालिका येणार याची प्रेक्षक वाच पाहात आहेत.