राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना आता शाळेतील वर्गमंत्री निवडणुकीचा कल्ला होणार आहे. आघाडीचे मराठी कन्टेट क्रिएटर खास रे टीव्ही यांच्यातर्फे वर्गमंत्री या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली असून, अक्षया देवधर, अविनाश नारकर, नेहा शितोळे यांच्यासह उत्तमोत्तम स्टारकास्ट या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे. ८ नोव्हेंबरपासून ही वेबसेरीज आपल्या भेटीला येणार आहे.
Read More
कलाकारांना सोशल मिडियावर कोणत्याही कारणाने ट्रोल करणं सुरुच असतं. कधी त्यांच्या राजकीय, सामाजिक मतांवरुन तर कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींवरुन त्यांना कायम टार्गेट केलं जातं. सध्या अभिनेते अविनाश नारकर यांना नेटकऱ्याने त्यांच्या डान्सवरुन ट्रोल केले आहे. अविनाश नारकर त्यांच्या पत्नी ऐश्वर्या नारकर सोबत सोशल मीडियावरील ट्रेण्ड फॉलो करताना दिसत असतात. नुकताच अविनाश यांनी एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला होता. ज्यावर एका नेटकऱ्याने असभ्य भाषेत प्रतिक्रिया दिली असून नारकरांनी सडेतोड उत्तर दिलं.
झी मराठी, कलर्स मराठी या वाहिन्यांवरील अनेक मालिका निरोप घेत असून त्यात आता आणखी एका वाहिनीवरील मालिका संपणार आहे. मालिका विश्व आणि सोशल मिडियावर सक्रिय असणाऱ्या अविनाश नारकर (Avinash Narkar) यांची मालिका ‘कन्यादान’ इक्झिट (Avinash Narkar) घेणार आहे.