एलॉन मस्क यांच्या मालकीच्या ट्विटर या प्रभावशाली समाजमाध्यमाने केलेल्या भविष्यवाणीमुळे पाकची डोकेदुखी वाढली आहे. त्याचे झाले असे की, रविवारी या भागातील लोकांनी पाकिस्तान सरकारच्या अधिकृत हॅण्डलमधील घडामोडी पाहण्यासाठी त्यावर क्लिक केले, तेव्हा हे हॅण्डल ब्लॉक करण्यात आल्याचा संदेश झळकला. यासोबतच हा भाग भारताचा भाग असलेल्या काश्मीर अंतर्गत असल्याचे सांगण्यात आले.
Read More
१९४७ मध्ये पाकिस्तानने बळजबरीने गिलगिट-बाल्टिस्तानवर कब्जा केल्यानंतर तिथल्या कुशासनामुळे हा प्रदेश विकास आणि प्रगतीपासून वंचित ठेवला गेला व यामुळेच यावरून पाकिस्तान सरकारवर टीका होत आली. अशा स्थितीत या प्रदेशाच्या प्रशासकीय स्थितीशी छेडछाड करणे उपयुक्त उपायाऐवजी राजकीय उपायच म्हटला पाहिजे.
गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशात पाकिस्तानकडून आता बुद्धाच्या वारशाची नासधूस सुरू आहे. सगळ्या जगाला शांती आणि अहिंसेचे धडे देणारा बुद्ध युद्धपिपासू पाकिस्तानला कधीच पटणार नाही. किंबहुना, पाकिस्तानला बुद्ध नको आहे. मात्र, त्याकरिता ऐतिहासिक वारसा पुसण्याचा उद्योग चालवून पाकिस्तान नेमका कोणता संदेश देऊ इच्छितो?
गेल्या ७०पेक्षा अधिक वर्षांपासून गिलगिट-बाल्टिस्तान आणि काश्मीरचा काही भाग बळकावणार्या पाकिस्तानला या प्रदेशातून लवकरच चंबुगबाळ आवरावे लागेल, याचे थेट संकेत भारताने दिले. तसेच पाकिस्तानच्या शिरपेचात अपयशाचा आणखी एक तुरा खोवण्यापासून भारताला कोणीही रोखू शकत नाही, हेही निश्चित झाले.