नवी दिल्ली: (BJP National Team 2026) भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी १७ ऑगस्ट २०२६ रोजी पक्षाच्या नवीन राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची आणि संघटनात्मक जबाबदाऱ्यांची अधिकृत घोषणा केली आहे. पक्षाला संघटनात्मकदृष्ट्या अधिक मजबूत करणे आणि अनुभवी नेत्यांसोबतच तरुण चेहऱ्यांना संधी देऊन योग्य समतोल साधणे हा या नव्या नियुक्तींमागील मुख्य उद्देश आहे. या नवीन टीममध्ये महाराष्ट्रातील नेत्यांना महत्त्वाच्या आणि प्रभावी जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. (BJP National Team 2026)
महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करण्यासाठी आणि राष्ट्रीय पातळीवर राज्याचे नेतृत्व वाढवण्यासाठी पक्षाने काही प्रमुख नेत्यांना महत्त्वाच्या भूमिका दिल्या आहेत. महाराष्ट्रातील भाजपच्या वरिष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांची पक्षाच्या 'राष्ट्रीय उपाध्यक्ष' पदी निवड करण्यात आली आहे. तर, पक्षाच्या केंद्रीय संघटनेत अत्यंत प्रभावी कामगिरी बजावणाऱ्या विनोद तावडे यांची 'राष्ट्रीय महासचिव' म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाचे कार्यभार कायम ठेवले आहेत. (BJP National Team 2026)
केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्रातील पक्षाचा मोठा चेहरा असलेले पीयूष गोयल यांच्याकडे पक्षाच्या 'राष्ट्रीय कोषाध्यक्ष'पदाची अत्यंत महत्त्वाची आणि जबाबदारीची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यासोबतच, डिजिटल संवाद व सोशल मीडिया तंत्रज्ञान प्रभावीपणे हाताळणाऱ्या प्रीति गांधी यांची राष्ट्रीय 'सोशल मीडिया सह-संयोजक' म्हणून नियुक्ती झाली आहे. (BJP National Team 2026)
भाजप नवीन राष्ट्रीय पदाधिकारी यादी (२०२६)
राष्ट्रीय सदस्य (BJP National Team 2026)
वसुंधरा राजे सिंधिया (राजस्थान)
तीरथ सिंह रावत (उत्तराखंड)
राम माधव (दिल्ली)
बैजयंत जय पांडा (ओडिशा)
डी. पुरंदेश्वरी (आंध्र प्रदेश)
रेखा वर्मा (उत्तर प्रदेश)
वर्षाबेन नरेंद्रभाई दोशी (गुजरात)
डॉ. भारती प्रवीण पवार (महाराष्ट्र)
मनप्रीत सिंह बादल (पंजाब)
लाल सिंह आर्य (मध्य प्रदेश)
प्रो. एम. नागराज (कर्नाटक)
प्रो. तारिक मंसूर (उत्तर प्रदेश)
डॉ. मधुचंद्र कर (पश्चिम बंगाल)
राष्ट्रीय महासचिव (महामंत्री)
विनोद तावडे (महाराष्ट्र)
सुनील बंसल (दिल्ली)
बिप्लब कुमार देब (त्रिपुरा)
स्मृति ईरानी (उत्तर प्रदेश)
सतीश पूनिया (राजस्थान)
गजेंद्र पटेल (मध्य प्रदेश)
हरीश द्विवेदी (उत्तर प्रदेश)
संजय भाटिया (हरियाणा)
राष्ट्रीय संघटना महामंत्री (BJP National Team 2026)
बी. एल. संतोष
राष्ट्रीय सह-संगठन महामंत्री (BJP National Team 2026)
शिवप्रकाश
सौदान सिंह
राष्ट्रीय मंत्री (BJP National Team 2026)
कविता पाटीदार (मध्य प्रदेश)
के. सुरेंद्रन (केरल)
डॉ. भोला सिंह (उत्तर प्रदेश)
डॉ. प्रदीप वर्मा (झारखंड)
जगदीश ईश्वरभाई पटेल (गुजरात)
संदीप पाठक (दिल्ली)
फांग्नोन कोन्यक (नागालँड)
संगीता यादव (उत्तर प्रदेश)
अनिल अँटनी (केरल)
डॉ. एम. वेंकटेशन (तमिळनाडू)
मनोज टिग्गा (पश्चिम बंगाल)
सिद्धार्थ शंभु (बिहार)
डॉ. स्वदेश सिंह (दिल्ली)
मृगांका देव बर्मन (आसाम)
रोहन गुप्ता (गुजरात)
जय प्रकाश (दिल्ली)
राष्ट्रीय कोषाध्यक्ष (BJP National Team 2026)
पीयूष गोयल (महाराष्ट्र)
राष्ट्रीय सह-कोषाध्यक्ष
राजेश मंगल (राजस्थान)
राष्ट्रीय कार्यालय प्रभारी (BJP National Team 2026)
तरुण चुघ (पंजाब)
राष्ट्रीय कार्यालय मंत्री (BJP National Team 2026)
महेंद्र पांडे (उत्तराखंड)
नॉर्थ ईस्ट संयोजक (BJP National Team 2026)
डॉ. संबित पात्रा (ओडिशा)
नॉर्थ ईस्ट सह-संयोजक (BJP National Team 2026)
राजीव बब्बर (दिल्ली)
प्रकोष्ठ संकुल संयोजक
विष्णु दत्त शर्मा (मध्य प्रदेश)
प्रकोष्ठ संकुल सह-संयोजक (BJP National Team 2026)
ऋतुराज सिन्हा (बिहार)
विष्णु वर्धन रेड्डी (आंध्र प्रदेश)
मोर्चा अध्यक्ष (BJP National Team 2026)
युवा मोर्चा: डॉ. हेमांग जोशी (गुजरात)
महिला मोर्चा: रूप कुमारी चौधरी (छत्तीसगड)
ओबीसी मोर्चा: अमरपाल मौर्य (उत्तर प्रदेश)
किसान मोर्चा: बंसीलाल गुर्जर (मध्य प्रदेश)
एससी मोर्चा: शिवेश कुमार राम (बिहार)
एसटी मोर्चा: डॉ. मन्नालाल रावत (राजस्थान)
अल्पसंख्यक मोर्चा: कुंवर बासित अली (उत्तर प्रदेश)