मुंबई (Vimal Elaichi FDA Action) : बॉलिवूडचे सुपरस्टार शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांच्या ‘विमल इलायची’च्या जाहिरातीवरून महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणावर FDAचे मुख्य आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका मुलाखतीत स्पष्ट भूमिका मांडली आहे. “तुमच्या दृष्टिकोनातून ते सुपरस्टार असतील, पण माझ्यासाठी ते जाहिरातदार आहेत,” असे मुंढे यांनी म्हटले आहे.
‘विमल इलायची’च्या जाहिरातीच्या माध्यमातून पान मसाल्याची अप्रत्यक्ष जाहिरात केली जात असल्याचा FDAचा आरोप आहे. याच प्रकरणात शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आल्या आहेत. जाहिरातीतील त्यांच्या भूमिकेबाबत FDAकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. (Vimal Elaichi FDA Action)
‘स्टार असले तरी कायद्यापेक्षा मोठे नाहीत’
या कारवाईबाबत बोलताना तुकाराम मुंढे यांनी सेलिब्रिटींच्या स्टारडमपेक्षा कायद्याचे पालन महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. “तुमच्या दृष्टीनं ते सुपरस्टार असतील, पण माझ्यासाठी ते केवळ जाहिरातदार आहेत आणि कायद्याचं उल्लंघन झाल्याचे प्रकरण आहे. कायदा त्याचं काम करेल,” अशी भूमिका त्यांनी मांडली. (Vimal Elaichi FDA Action)
मुंढे यांच्या म्हणण्यानुसार, जाहिरातीमध्ये एखाद्या उत्पादनाचे समर्थन करणाऱ्या सेलिब्रिटीचीही जबाबदारी निश्चित होऊ शकते. त्यामुळे संबंधित जाहिरातीच्या कायदेशीरतेची चौकशी करून नियमांनुसार पुढील कारवाई केली जात आहे. (Vimal Elaichi FDA Action)
११ ऑगस्टला FDAकडून नोटिस
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) ग्रेटर मुंबई विभागाने ११ ऑगस्ट २०२६ रोजी शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. ‘विमल इलायची’च्या जाहिरातीसंदर्भात या नोटिसा देण्यात आल्या असून, संबंधित जाहिरातीबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. नोटिसीला उत्तर देण्यासाठी संबंधितांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती.
शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांसारखे लोकप्रिय अभिनेते ‘विमल इलायची’च्या जाहिरातीत झळकल्याने ही जाहिरात चर्चेत आली होती. आता FDAच्या नोटिस आणि तुकाराम मुंढे यांच्या वक्तव्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. (Vimal Elaichi FDA Action)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.