मुंबई : (Public Awareness Campaign) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वस्त भारत सशक्त भारत या संकल्प अंतर्गत भाजप मुंबई महिला मोर्चा द्वारा आयोजित कमी तेल गॅस बचत ' जनजागरण अभियानात मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्यासह महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी उपस्थित होते. याबाबतची माहिती त्रिपाठी यांनी आपल्या एक्स हँडलवरून बुधवार दि. १७ रोजी दिली आहे.
यावेळी केंद्रीय श्रम ,रोजगार, युवाकार्य आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास मुंबई भाजपा महामंत्री राजेश शिरवडकर, महिला मोर्चा मुंबई अध्यक्षा योजना ठोकले , महिला मोर्चा महामंत्री अंकिता चौधरी, प्रभाग समिति अध्यक्षा आशाताई मराठे , नगरसेविका प्रीति सातम यांसह मोठ्या संख्येत कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या. (Public Awareness Campaign)