तुमच्या मुलांची शाळा अधिकृत आहे का? आरटीआयमधून समोर आला मोठा धक्कादायक आकडा


मुंबई: (Unauthorised Schools In Maharashtra) राज्यातील शिक्षण व्यवस्थेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये महाराष्ट्रात तब्बल ५२६ शाळा अनधिकृतपणे सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. शासनाची आवश्यक मान्यता आणि 'यू-डायस' (UDISE) क्रमांक न घेता नियमांचे उल्लंघन करून या शाळा चालविल्या जात असल्याचे माहितीच्या अधिकारात (RTI) उघडकीस आले आहे. (Unauthorised Schools In Maharashtra)

माहितीच्या अधिकारात धक्कादायक खुलासा

सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी आरटीआयअंतर्गत मागवलेल्या माहितीला शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिलेल्या उत्तरातून ही गंभीर बाब समोर आली आहे. शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यभरात अनधिकृत शाळांवर खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. (Unauthorised Schools In Maharashtra)

एकूण अनधिकृत शाळा: ५२६

बंद केलेल्या शाळा: ४३

दाखल एफआयआर (FIR): १५५ शाळांविरोधात

नोटीस/दंड कारवाई: ४२२ शाळांवर

मुंबई विभागात सर्वाधिक अनधिकृत शाळा

राज्यातील एकूण अनधिकृत शाळांपैकी बहुतांश शाळा एकट्या मुंबई विभागात कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मुंबई विभाग: एकूण ४५२ अनधिकृत शाळा; ज्यांपैकी २३ शाळा बंद करण्यात आल्या आहेत, १४९ शाळांवर एफआयआर दाखल झाला असून ३९६ शाळांना नोटीस किंवा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले आहे. (Unauthorised Schools In Maharashtra)

पुणे विभाग:
५३ अनधिकृत शाळा आढळल्या; यातील १४ शाळा बंद करण्यात आल्या असून ९ शाळांवर एफआयआर दाखल केला आहे.

नागपूर विभाग: ११ अनधिकृत शाळांची नोंद; ५ शाळा बंद तर ४ वर एफआयआर दाखल.

इतर विभाग: नाशिक विभागात ४, अमरावतीत २ आणि छत्रपती संभाजीनगर विभागात ४ अनधिकृत शाळा आढळल्या आहेत.

सकारात्मक बाब: कोल्हापूर आणि लातूर विभागात एकही अनधिकृत शाळा आढळलेली नाही.

पालकांमध्ये चिंतेचे वातावरण; कारवाईच्या प्रभावीपणावर प्रश्नचिन्ह

शासकीय मान्यता नसतानाही या शाळांमध्ये सर्रास विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतले जात आहेत आणि वर्ग भरवले जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आणि शैक्षणिक प्रमाणपत्रांचा प्रश्न निर्माण झाला असून शिक्षण विभागाच्या कारवाईच्या प्रभावी अंमलबजावणीवर आणि दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (Unauthorised Schools In Maharashtra)






मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर