मुंबई: (FDA Action) अन्न व औषध प्रशासनाने (FDA) १ जुलैपासून राज्यभरात राबवलेल्या विशेष मोहिमेमुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि कॅन्टीन चालकांचे धाबे दणाणले आहेत. ४ ते ६ ऑगस्ट दरम्यान एफडीएने केलेल्या कारवाईत १० प्रमुख हॉटेल आस्थापनांवर कठोर कारवाई केली आहे. यापैकी मुंबईतील ४ नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, तर ५ आस्थापनांना थेट व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एका आस्थापनेला सुधारणा नोटीस बजावण्यात आली आहे. (FDA Action)
'या' ४ हॉटेल्सचे परवाने निलंबित; स्वच्छतेचे उडाले धिंडवडे
तपासणीदरम्यान अस्वच्छता आणि आरोग्य नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्यामुळे खालील हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले. (FDA Action)
ईट निनो (दादर पश्चिम): कीटकांचा वावर, कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव, अन्नाची व पाण्याची अनिवार्य चाचणी न करणे आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय नोंदी नसणे. (FDA Action)
जय माँ काली धाबा (अंधेरी पश्चिम): शौचालयाच्या बाजूला अन्नाची साठवणूक, अस्वच्छ भिंती, डिजिटल तापमान मीटरचा अभाव आणि खराब प्लायवूड रॅकचा वापर. (FDA Action) हाऊस ऑफ महाराष्ट्र (सांताक्रुझ पश्चिम): किचन आणि स्टोअर रूममध्ये झुरळांचा प्रचंड प्रादुर्भाव, अन्न पॅकिंगसाठी वर्तमानपत्रांचा वापर आणि स्वयंपाकाची गंजलेली भांडी. (FDA Action)
साऊथ इंडिया डोसा कॉर्नर (कुर्ला पश्चिम): सांडपाणी व कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट आणि उपकरणांची प्रचंड अस्वच्छता. (FDA Action)
'आयआयटी मुंबई'च्या कँटीनसह ५ आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याचे निर्देश. अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत आवश्यक असलेला अन्न परवाना किंवा नोंदणीच नसल्याने खालील ५ आस्थापनांना व्यवसाय तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (FDA Action)
१. आयआयटी मुंबई (IIT Bombay) मधील २ उपहारगृहे
२. मारूश हॉटेल (प्रभादेवी)
३. छत्रधार कॅटरर्स (वांद्रे पश्चिम)
४. विजयदीप महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था (शिवाजी नगर)
भेसळ आणि अस्वच्छतेविरोधात तक्रार कशी करावी?
अन्नाच्या दर्जाबाबत किंवा भेसळीबाबत शंका आल्यास नागरिकांनी खालील माध्यमांतून एफडीएकडे तक्रार नोंदवावी. (FDA Action)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.