रुपाली चाकणकरांनंतर महिला संघटनेला नवे नेतृत्व; राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची नियुक्ती!


मुंबई: (Vaishali Nagwade NCP Women President) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे आणि युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र प्रदान केले. (Vaishali Nagwade NCP Women President)

दरम्यान, भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. (Vaishali Nagwade NCP Women President)

वैशाली नागवडे यांचा राजकीय प्रवास आणि परिचय

पक्ष: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)

पद: महाराष्ट्र राज्य महिला प्रदेशाध्यक्ष

जन्मतारीख:
११ फेब्रुवारी १९७३

शिक्षण: बी.कॉम (एस. पी. कॉलेज)

महत्त्वाच्या जबाबदाऱ्या व कार्यकाळ:

२००२-०५: संचालक - अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ

२००५-२०१६: संचालक - महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंद)

२००७-२०१२: सदस्य - पंचायत समिती, दौंड

२००९-२०२१: अध्यक्ष - पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस (१२ वर्षे)

२०१०: अध्यक्ष - पंचायत राज कमिटी, महाराष्ट्र राज्य

२०१३-२०१६:
अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंद)

२०१४-२०१६: संचालक - नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (NDDB), आनंद, गुजरात

२०१४-२०१६: संचालक - इंडियन व्हेटर्नरी रिसर्च इन्स्टिट्यूट (IVRI), बरेली, उत्तर प्रदेश

'अजितदादांच्या कामाचा माणूस हा विचार तळागाळात नेणार'- वैशाली नागवडे

नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना वैशाली नागवडे म्हणाल्या, "गेल्या २६ वर्षांचा हा प्रवास आहे. राजकारणाची सुरुवात दिवंगत अजित पवारांमुळे झाली, आज त्यांची कायम उणीव जाणवत राहील. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र मिळाल्याने जबाबदारी खूप वाढली आहे. अजितदादांची 'कामाचा माणूस' ही ओळख तळागाळातील लोकांपर्यंत घेऊन जाणे हे आमचे ध्येय असेल." (Vaishali Nagwade NCP Women President)

काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेताना त्या म्हणाल्या, "पुण्यात आम्ही काल याविरोधात आंदोलन केले. काँग्रेसला सुनेत्रा पवारांचे दुःख कळायला हवे होते. अशा प्रकारे टीका करणे काँग्रेसला शोभणारे नाही." (Vaishali Nagwade NCP Women President)

'पक्षाकडून मोठी जबाबदारी मिळाली'- निखिल ठाकरे

नवनिर्वाचित युवक प्रदेशाध्यक्ष निखिल ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, "पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. संघटना ही नेत्याचा स्वाभिमान असते आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर उभा राहतो. यापूर्वी सूरज चव्हाण यांच्या बाबतीत घडलेली घटना पुन्हा होणार नाही, याची काळजी घेतली जाईल." (Vaishali Nagwade NCP Women President)







मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर