FDA चा मोठा निर्णय! राज्यात 'अॅनालॉग' पनीरच्या विक्रीवर एक वर्षासाठी पूर्ण बंदी; 'अॅनालॉग' पनीर म्हणजे नक्की काय?


मुंबई: (FDA Ban On Analogue Paneer Maharashtra) अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यात भेसळखोरांविरुद्ध कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांची फसवणूक थांबवण्यासाठी आणि आरोग्याशी होणारा खेळ रोखण्यासाठी राज्य सरकारने 'अॅनालॉग' म्हणजेच वनस्पतीजन्य तेलांपासून तयार केल्या जाणाऱ्या कृत्रिम पनीरच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर संपूर्ण राज्यात १ वर्षासाठी पूर्ण बंदी घातली आहे. (FDA Ban On Analogue Paneer Maharashtra)

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतचे अधिकृत आदेश जारी केले असून, आता राज्यात केवळ शुद्ध दुधापासून बनवलेल्या अस्सल पनीरच्या विक्रीलाच परवानगी असणार आहे. (FDA Ban On Analogue Paneer Maharashtra)

'अॅनालॉग' पनीर म्हणजे नक्की काय?

दुधातील मूळ स्निग्धांश काढून त्याऐवजी वनस्पतीजन्य तेल, पाम तेल, डालडा किंवा इतर दुग्धेतर पदार्थांचा रासायनिक प्रक्रियेद्वारे वापर करून हुबेहूब पनीरसारखा दिसणारा पदार्थ तयार केला जातो, त्याला 'अॅनालॉग पनीर' म्हणतात. हे पनीर दिसायला हुबेहूब मूळ पनीरसारखे असले तरी ते आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. (FDA Ban On Analogue Paneer Maharashtra)

३५.४ टक्के नमुने निकृष्ट; एफडीएच्या तपासात धक्कादायक खुलासा

१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत एफडीएने राज्यभरात राबवलेल्या विशेष तपासणी मोहिमेत ही भीषण वास्तवता समोर आली. (FDA Ban On Analogue Paneer Maharashtra)

तपासलेले नमुने: ३०८

दोषी नमुने: १०९ (३५.४ टक्के नमुने भेसळयुक्त)

आरोग्याला धोका: ७९ नमुने अत्यंत निकृष्ट दर्जाचे तर ३० नमुने आरोग्यासाठी थेट धोकादायक (असुरक्षित) असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालात सिद्ध झाले. (FDA Ban On Analogue Paneer Maharashtra)

हॉटेलमधील पनीरच्या डिशेस महागणार?

हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये मोठ्या प्रमाणावर स्वस्त मिळणाऱ्या या कृत्रिम 'अॅनालॉग' पनीरचा वापर केला जात होता. आता केवळ शुद्ध दुधापासून बनवलेल्या पनीरचाच वापर करणे बंधनकारक झाल्यामुळे हॉटेलमधील पनीरच्या डिशेसचे भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे खवय्यांच्या खिशावर थोडा ताण पडणार असला, तरी या निर्णयामुळे नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहणार आहे. (FDA Ban On Analogue Paneer Maharashtra)






मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर