मुंबई: (DY Patil Passes Away) भारतातील अग्रगण्य शिक्षणसंस्थांचे प्रणेते, माजी राज्यपाल आणि 'शिक्षणमहर्षी' पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव तथा डी. वाय. पाटील यांचे आज मंगळवारी ४ ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे वयाच्या ९० व्या वर्षी दुःखाद निधन झाले. शून्यातून शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा आणि राजकीय विश्व उभारणाऱ्या डॉ. डी. वाय. पाटील यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रासह देशाच्या शैक्षणिक व सार्वजनिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. (DY Patil Passes Away)
शेतकरी कुटुंबातून 'शिक्षणसम्राट' पदापर्यंतचा प्रवास
२२ ऑक्टोबर १९३५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील अंबाप या शेतीप्रधान गावात एका साध्या बहुजन शेतकरी कुटुंबात डॉ. डी. वाय. पाटील यांचा जन्म झाला. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि डॉ. संजय डी. पाटील हे त्यांचे सुपुत्र असून, आमदार ऋतुराज पाटील हे त्यांचे नातू आहेत. (DY Patil Passes Away)
राजकीय आणि प्रशासकीय कारकीर्द
१९५७ ते १९६२ या काळात ते कोल्हापूरचे महापौर होते. त्यानंतर १९६७ आणि १९७२ मध्ये त्यांनी पन्हाळा मतदारसंघातून विधानसभेवर आमदार म्हणून नेतृत्व केले. त्यांनी त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे राज्यपाल म्हणून अत्यंत यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली. पुढे २०१८ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. (DY Patil Passes Away)
शैक्षणिक, क्रीडा अन् सहकार क्षेत्रातील योगदान
पुणे, नवी मुंबई आणि कोल्हापूर येथे वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन व दंतवैद्यकीय महाविद्यालये तसेच डिम्ड विद्यापीठांची स्थापना करून त्यांनी लाखो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'डी. वाय. पाटील स्टेडियम' ही त्यांचीच देन आहे. तसेच गरीब रुग्णांसाठी अनेक चॅरिटेबल रुग्णालये उभारून त्यांनी आरोग्य क्षेत्रात मोठी सेवा बजावली. कोल्हापूर जिल्ह्यातील बावडा येथील 'डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना' च्या माध्यमातून त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास साधला. (DY Patil Passes Away)
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मान
पद्मश्री पुरस्कार: शिक्षण आणि समाजसेवेतील अफाट योगदानाबद्दल भारत सरकारने १९९१ मध्ये त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित केले. (DY Patil Passes Away)
मानद डॉक्टरेट (D.Lit): अमेरिकेचे 'वर्ल्ड युनिव्हर्सिटी राउंडटेबल' (१९८५), ब्रिटनचे 'नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटी' (१९९६) आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (२०१५) कडून त्यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. (DY Patil Passes Away)