मुंबई: (Dr DY Patil Passes Away) ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल आणि डी. वाय. पाटील समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव तथा डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण आणि सार्वजनिक क्षेत्रातील एक दूरदर्शी नेतृत्व हरपले आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. "शिक्षण, समाजसेवेसह राष्ट्रनिर्मितीला वाहिलेले एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आज आपण गमावले आहे," अशा शब्दांत उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. (Dr DY Patil Passes Away)
"सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास..."- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.
सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास महापौर, लोकप्रतिनिधी आणि पुढे विविध राज्यांचे राज्यपाल अशा महत्त्वाच्या घटनात्मक पदापर्यंत पोहोचला. शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून समाजातील सर्वसामान्य आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची संधी पोहोचविण्यासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले. शिक्षण आणि वैद्यकीय संस्थांचे जाळे उभारण्याबरोबरच त्यांनी नवी मुंबईत जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल साकारले, तसेच कृषी व सामाजिक क्षेत्रातही आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या निधनाने एक दूरदर्शी व्यक्तिमत्त्व हरपले आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ॐ शांती
"शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे माध्यम मानणारे नेतृत्व"- सुनेत्रा पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात डॉ. डी. वाय. पाटील यांच्या अफाट कार्याचा गौरव केला. त्या म्हणाल्या, "डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम मानून आयुष्यभर कार्य केले. देशभरात शेकडो शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालये उभारून त्यांनी लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली." (Dr DY Patil Passes Away)
शिक्षण क्षेत्रासोबतच आरोग्य, क्रीडा आणि सामाजिक विकासातील त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आणि चिरस्मरणीय राहील. (Dr DY Patil Passes Away)
देशाने एक दूरदर्शी शिक्षणमहर्षी गमावला
आपल्या शोकसंदेशाचा शेवट करताना उपमुख्यमंत्री म्हणाल्या, "डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने देशाने एक महान शिक्षणमहर्षी आणि अनुभवी सार्वजनिक नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना." (Dr DY Patil Passes Away)

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल आणि डी. वाय. पाटील समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव तथा डी. वाय. पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.

शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानून त्यांनी आयुष्यभर कार्य केले. देशभरात शैक्षणिक संस्था, विद्यापीठे तसेच… pic.twitter.com/p8goE2XWiU
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) August 4, 2026

राज्यपाल म्हणून बजावलेली यशस्वी कारकीर्द
डॉ. डी. वाय. पाटील यांनी केवळ शिक्षण क्षेत्रातच नव्हे, तर देशाच्या घटनात्मक पदांवरही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यांनी त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून घटनात्मक मूल्ये जपत आपल्या जबाबदाऱ्या अत्यंत यशस्वीपणे पार पाडल्या. सार्वजनिक जीवनात त्यांनी साधेपणा, दूरदृष्टी आणि समाजहिताची भूमिका कायम जपली, ज्यामुळे ते सर्वपक्षीय आणि सर्वसमावेशक नेते म्हणून ओळखले गेले. (Dr DY Patil Passes Away)