मुंबई: (Mumbai Rain Update) बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र गुजरातच्या दिशेने सरकल्याने रविवारी मुंबई आणि परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मात्र, सोमवारपासून मुंबईसह बहुतांश भागांत पावसाचा जोर बऱ्यापैकी कमी होणार असून केवळ हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हवामानशास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ते ६ ऑगस्टदरम्यान राज्यातील अनेक भागांत पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. (Mumbai Rain Update)
मुंबई अन् उपनगरांत रविवारी धुमाकूळ, आता केवळ हलक्या सरी
पहाटे विश्रांती घेतल्यानंतर रविवारी सकाळी १० वाजल्यापासून पूर्व उपनगरातील कुर्ला, विद्याविहार, बीकेसी, घाटकोपर तसेच पश्चिम उपनगरांत पावसाने जोरदार हजेरी लावली होती. सोमवारपासून ही प्रणाली कमकुवत होत असल्याने मुंबई आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पावसात घट होईल आणि केवळ अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी बरसतील. (Mumbai Rain Update)
'या' भागात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार!
हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांच्या अंदाजानुसार, ऑगस्ट महिन्यातील पावसाची स्थिती विभागनिहाय खालीलप्रमाणे राहील. (Mumbai Rain Update)
सरासरीपेक्षा जास्त पाऊस:
संपूर्ण मराठवाडा, सोलापूर तसेच पूर्व विदर्भातील वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Mumbai Rain Update)
सरासरीपेक्षा कमी पाऊस:
मुंबईसह संपूर्ण कोकण, खान्देश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा, अकोला व वर्धा जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Mumbai Rain Update)
४ ते ६ ऑगस्टदरम्यान राज्यातील पावसाचे स्वरूप
खान्देश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात केवळ हलक्या श्रावणसरी पडतील. मुंबई, संपूर्ण कोकण आणि पूर्व विदर्भात ६ ऑगस्टपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहील. (Mumbai Rain Update)