मुंबई: (Maharashtra SDRF Fund 500 Crore) देशातील विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) अंतर्गत एकूण २,११७.८५ कोटी रुपयांचा आगाऊ निधी मंजूर करण्यात आला असून, यामध्ये महाराष्ट्रासाठी तब्बल ५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यासंदर्भातील माहिती दिली असून, अतिवृष्टीग्रस्त भागांतील मदत आणि पुनर्वसनाच्या कामांना वेग देण्यासाठी हा निधी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल. या मदतीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. (Maharashtra SDRF Fund 500 Crore)
कोणत्या राज्याला किती निधी मंजूर?
केंद्र सरकारने पूर आणि अतिवृष्टीची तीव्रता विचारात घेऊन विविध राज्यांना पुढीलप्रमाणे निधी मंजूर केला आहे. (Maharashtra SDRF Fund 500 Crore)
महाराष्ट्र: ५०० कोटी रुपये
गुजरात: ५०० कोटी रुपये
ओडिशा: ९०० कोटी रुपये (दुसरा हप्ता)
अरुणाचल प्रदेश: ३८४.७७ कोटी रुपये
आसाम: ३७६.३५ कोटी रुपये
हिमाचल प्रदेश: २९३.८५ कोटी रुपये (दुसरा हप्ता)
एकूण मंजूर निधी: ₹२,११७.८५ कोटी
आपत्तीग्रस्तांपर्यंत जलद मदत पोहोचणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यंदाच्या मान्सूनमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा आणि पुराचा मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राकडून मिळालेल्या ५०० कोटी रुपयांच्या निधीमुळे आपत्तीग्रस्त भागांतील बचाव मोहीम, तातडीची मदत आणि बाधित कुटुंबांचे पुनर्वसन अधिक वेगाने करता येणार असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. (Maharashtra SDRF Fund 500 Crore)
SDRF म्हणजे काय?
SDRF (State Disaster Response Fund) म्हणजेच 'राज्य आपत्ती प्रतिसाद निधी'. पूर, अतिवृष्टी, भूस्खलन, चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक् आपत्तींच्या काळात बचावकार्य आणि तातडीने मदत पुरवण्यासाठी केंद्र सरकारकडून हा निधी राज्यांना दिला जातो. परिस्थितीचे गांभीर्य पाहून केंद्र सरकार याचा आगाऊ हप्ताही मंजूर करते. (Maharashtra SDRF Fund 500 Crore)
गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्रीय पथके आधीच काही राज्यांचा दौरा करत असून, परिस्थितीनुसार अतिरिक्त आर्थिक व लष्करी मदत पुरवली जाईल. (Maharashtra SDRF Fund 500 Crore)