मुंबई: (Tukaram Mundhe Rajasthan Transfer) महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाची धुरा हाती घेतल्यापासून कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोर आणि अस्वच्छ उपहारगृहांविरोधात धडक मोहीम उघडली आहे. रोज टाकल्या जाणाऱ्या धाडी आणि परवाने रद्द करण्याच्या धडक कारवाईमुळे राज्यभरात खळबळ उडालेली असतानाच, सोशल मीडियावर त्यांच्या बदलीबाबत एका मेसेजने मोठी चर्चा घडवून आणली होती. महाराष्ट्रातून थेट राजस्थानमधील 'सीकर' येथे त्यांची २६ वी बदली झाल्याचा दावा या मेसेजमध्ये केला जात होता. मात्र, या दाव्यात काहीही तथ्य नसून हा दावा पूर्णपणे फोल असल्याचे स्वतः तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. (Tukaram Mundhe Rajasthan Transfer)
पत्रकार परिषदेत बोलताना तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या बदलीच्या व्हायरल मेसेजवर थेट भाष्य करत अफवांना पूर्णविराम दिला. ते म्हणाले, "माझा राजस्थानशी काय संबंध? माझी बदली राजस्थानमध्ये कशी होऊ शकते? मी महाराष्ट्र कॅडरचा अधिकारी असल्याने माझी बदली केवळ महाराष्ट्रातच होऊ शकते," असे स्पष्ट करत त्यांनी व्हायरल दाव्यांमधील हवा काढून घेतली. (Tukaram Mundhe Rajasthan Transfer)
एफडीएच्या धडक कारवाईमुळे धास्तावलेल्या घटकांकडून किंवा सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांकडून असा चुकीचा मेसेज व्हायरल केला गेल्याची चर्चा आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आणि लाचखोरीच्या प्रकरणांमुळे चर्चेत आलेल्या अन्न व औषध प्रशासनात सुधारणा घडवून आणण्यासाठी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने मुंढे यांची आयुक्तपदी नियुक्ती केली होती. (Tukaram Mundhe Rajasthan Transfer)
तुकाराम मुंढे यांनी २५ मे रोजी एफडीए आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी अन्न भेसळखोर, दुग्ध व्यावसायिक आणि नियम मोडणाऱ्या उपाहारगृहांवर कठोर कारवाईचे सत्र सुरू ठेवले आहे. (Tukaram Mundhe Rajasthan Transfer)
तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एफडीए प्रशासनाने संपूर्ण महाराष्ट्रात अस्वच्छता, अॅनालॉग पनीर आणि अन्न भेसळीविरोधात कारवाई तीव्र केली आहे. अनेक आस्थापनांचे हॉटेल परवाने रद्द करण्यात आले आहेत. या धडक मोहिमेमुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले असून, तुकाराम मुंढे महाराष्ट्रातच राहून ही मोहीम पुढे नेणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. (Tukaram Mundhe Rajasthan Transfer)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.