मुंबई: (FDA Maharashtra) महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यात भेसळयुक्त अन्नपदार्थ, अस्वच्छ हॉटेल्स आणि बनावट उत्पादनांवर धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. याच धडक मोहिमेचा भाग म्हणून बॉलिवूडचे सुपरस्टार शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना बजावण्यात आलेल्या नोटीसवर तुकाराम मुंढे यांनी पीटीआय (PTI) न्यूज एजन्सीशी बोलताना पहिली महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. "विमल इलायचीची जाहिरात ही प्रत्यक्षात महाराष्ट्रात बंदी असलेल्या विमल गुटख्याचीच सरोगेट (अप्रत्यक्ष) जाहिरात आहे," असा स्पष्ट दावा त्यांनी केला आहे. (FDA Maharashtra)
बॉलिवूड कलाकारांना पाठवलेल्या नोटीसबाबत अधिक स्पष्टता देताना अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, विमल कंपनी ही गुटख्याचे उत्पादन आणि विक्री करण्याच्या प्रक्रियेत दीर्घकाळापासून समाविष्ट राहिलेली आहे. "जरी ते सध्या महाराष्ट्रात उत्पादन करत नसले, तरी आमच्या तपासात, छापेमारीत आणि जप्तीच्या कारवायां दरम्यान अनेक ठिकाणी 'विमल प्रॉडक्ट्स' हे गुटखा म्हणूनच विकले जात असल्याचे निष्पन्न झाले आहे," असा खुलासा त्यांनी केला. (FDA Maharashtra)
टीव्हीवर ही जाहिरात केवळ 'माउथ फ्रेशनर' किंवा 'इलायची'ची असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात ती राज्यातील प्रतिबंधित पदार्थाची अप्रत्यक्ष जाहिरात आहे. याच कारणामुळे संबंधित कलाकारांकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. (FDA Maharashtra)
VIDEO | PTI Exclusive: "Vimal manufactures and sells gutka; its advertisement claiming to be for 'Elaichi' appears to be surrogate promotion of a prohibited item in the state", says Maharashtra FDA Commissioner Tukaram Mundhe on notices issued to Bollywood actors Shah Rukh Khan,… pic.twitter.com/suO8uNfBO0
तुकाराम मुंढे यांनी विभागाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एफडीएच्या पथकांनी दररोज राज्यातील विविध शहरांमधील हॉटेल्स, डेअरी आणि दुकानांवर छापे मारून अस्वच्छता किंवा भेसळ आढळल्यास परवाने निलंबित करण्याचा धडाका लावला आहे. यापूर्वी विमल इलायचीच्या ९ पानांच्या नोटीसद्वारे शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना १५ दिवसांच्या आत स्पष्टीकरण सादर करण्याचे आणि जाहिरातीचे सोशल मीडिया प्रमोशन तातडीने थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (FDA Maharashtra)
विमल ब्रँडचा जुना वाद आणि न्यायालयीन पार्श्वभूमी
२०१८ मध्ये 'डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस'ने (DGHS) 'विष्णू पाउच पॅकेजिंग प्रायव्हेट लिमिटेड'ला नोटीस पाठवून तंबाखूच्या अप्रत्यक्ष प्रचाराचा आरोप केला होता. कंपनीने आपण देशांतर्गत बाजारासाठी तंबाखू उत्पादने बनवत नसल्याचा युक्तिवाद करत कोर्टात आव्हान दिले होते. पुढे जानेवारी २०२४ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने DGHS चे हे अपील फेटाळून लावले होते. (FDA Maharashtra)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.