काँग्रेस नेत्यांचे डोके ठिकाणावर आहे का? चेन्नीथल्लांनी कापला तिरंग्याचा केक! कट्टरपंथींच्या मतांसाठी आणखी किती पातळी सोडणार?


मुंबई: (Alleged disrespect to the Indian National Flag) स्वातंत्र्यासाठी ज्या राष्ट्रध्वजाखाली हजारो वीरांनी बलिदान दिले आणि ज्याच्या रक्षणासाठी सीमेवर जवान प्राणांची आहुती देतात, त्याच तिरंग्याचा घोर अवमान काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी चक्क तिरंगा ध्वजाच्या डिझाइनचा केक कापल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, या कृत्यामुळे संपूर्ण देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. यावरून भारतीय जनता पक्षाने काँग्रेसवर कडक शब्दांत ताशेरे ओढत काँग्रेसच्या देशविरोधी मानसिकतेचा पर्दाफाश केला आहे. (Alleged disrespect to the Indian National Flag)

“तिरंग्याचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही,” असे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. रमेश चेन्नीथला यांनी देशाची माफी मागावी आणि गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. (Alleged disrespect to the Indian National Flag)

भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत काँग्रेसच्या ढोंगी राष्ट्रभक्तीवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, “केरळचे गृहमंत्री आणि महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी थेट तिरंगा ध्वज असलेला केक कापला आहे. ज्या तिरंग्यासाठी हजारो क्रांतिकारकांनी बलिदान दिले, भारतीय जवान ज्याच्यासाठीव सीमेवर रक्त सांडतात, तो तिरंगा असलेला केक कापताना तुम्हाला लाज वाटत नाही. हा राष्ट्रध्वजाचा अपमान आहे.” (Alleged disrespect to the Indian National Flag)


"काँग्रेस नेते दिवसभर राष्ट्रभक्तीच्या बाता मारतात आणि दुसरीकडे उघडपणे राष्ट्रध्वजाचा अपमान करतात. रमेश चेन्नीथला आणि काँग्रेसने या देशद्रोही कृत्याबद्दल संपूर्ण देशाची बिनशर्त माफी मागितली पाहिजे," अशी जोरदार मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. (Alleged disrespect to the Indian National Flag)

रमेश चेन्नीथला यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधूनही अत्यंत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसचे हे कृत्य अत्यंत बेजबाबदार आणि राष्ट्रध्वजाचा मानभंग करणारे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. विरोधकांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर काँग्रेस पक्षाची पूर्णपणे कोंडी झाली असून त्यांच्याकडे या अवमानाचे समर्थन करण्यासाठी कोणतेही उत्तर उरलेले नाही. (Alleged disrespect to the Indian National Flag)




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर