महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार! 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'; मुंबईतही मुसळधार पावसाचा इशारा


मुंबई: (Maharashtra Weather Update) राज्यात सध्या अनेक भागांत श्रावण सरी कोसळत असून, आज पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याचा परिसर आणि पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Maharashtra Weather Update)

'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज १५ ऑगस्ट रोजी राज्यातील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर अतिशय जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे. तर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)

विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बाधित जिल्हे, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली. पावसाच्या वेळी वादळी वारे आणि विजांचा धोका लक्षात घेता नागरिकांनी झाडांखाली किंवा मोकळ्या मैदानात न थांबता आवश्यक ती खबरदारी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Weather Update)

मुंबई अन् उपनगरांत मुसळधार पावसाची हजेरी कायम

मुंबईसह उपनगरांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. आज मुंबईसाठी मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीपातळीत आधीच मोठी वाढ झाली असून पुढील काही दिवस मुंबईत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. उर्वरित महाराष्ट्रातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहील आणि श्रावण सरींचा अनुभव नागरिकांना येईल. (Maharashtra Weather Update)






मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर