मुंबई: (Pik Vima Yojana Extended Date August 10) राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलैवरून वाढवून आता १० ऑगस्ट २०२६ पर्यंत करण्यात आली आहे. तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची अपूर्णता किंवा ई-केवायसी प्रक्रियेमुळे अनेक शेतकऱ्यांना वेळेत अर्ज सादर करता आला नव्हता. अशा सर्व पात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. (Pik Vima Yojana Extended Date August 10)
राज्यात ६१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी; मराठवाडा आघाडीवर
कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यभरातून या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत ६१ लाख ८२ हजार २१८ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. (Pik Vima Yojana Extended Date August 10)
विभागनिहाय नोंदणीचा तपशील:
छत्रपती संभाजीनगर विभाग: १३,२५,००० (सर्वाधिक सहभाग)
अमरावती विभाग: ६,९१,९७३
पुणे विभाग: ६,०७,६६३
नागपूर विभाग: ४,५३,३८३
नाशिक विभाग: ३,३३,३८५
लातूर विभाग: २,४२,८२६
कोल्हापूर विभाग: २,४०,२५३
कोकण विभाग: १,०२,३३५
'या' पद्धतीने करा ऑनलाईन अन् ऑफलाईन अर्ज
कर्जदार शेतकरी, ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले आहे, त्यांनी आपल्या संबंधित बँकेशी तात्काळ संपर्क साधून विमा प्रक्रिया पूर्ण करावी. तर, बिगर कर्जदार शेतकरी, सीएससी (CSC) सेतू केंद्रांवर जाऊन किंवा 'PMFBY Crop Insurance' ॲप आणि अधिकृत संकेतस्थळावरून १० ऑगस्टपूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. (Pik Vima Yojana Extended Date August 10)
नैसर्गिक आपत्ती आणि एल निनोच्या पार्श्वभूमीवर कृषीमंत्र्यांचे आवाहन
हवामानातील अनिश्चितता, अतिवृष्टी, दुष्काळ, पूर, गारपीट आणि एल निनोच्या (El Nino) संभाव्य परिणामांमुळे पिकांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. एकही पात्र शेतकरी संरक्षणापासून वंचित राहू नये, म्हणूनच ही मुदतवाढ देण्यात आली असून १० ऑगस्टपूर्वी सर्व शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. (Pik Vima Yojana Extended Date August 10)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.