ऑगस्ट महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज! विदर्भ-मराठवाड्यात दिलासादायक चित्र; कुठे काय स्थिती असणार?


मुंबई: (IMD Rain Forecast August Maharashtra)
भारतीय हवामान विभागाने (IMD) मान्सूनच्या उत्तरार्धाबाबत महत्त्वाचा अंदाज वर्तवला असून, ऑगस्ट महिन्यात देशात तसेच महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने तेथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे साताऱ्यातील धोम धरण ८९ टक्के भरले असून कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (IMD Rain Forecast August Maharashtra)

कुठे सरासरी पार, तर कुठे पावसाची प्रतीक्षा?

१ जूनपासून आतापर्यंतच्या पावसाची आकडेवारी पाहता राज्यात मोठी विषमता दिसून येत आहे.

विदर्भ: सरासरी ४८४.७ मिमी ऐवजी ४६२.८ मिमी (९५%) पाऊस झाला आहे.

मराठवाडा: सरासरी ३०५.१ मिमी ऐवजी २८१.७ मिमी (९२%) पावसाची नोंद झाली आहे.

कोकण: सरासरी १७५५ मिमी ऐवजी १७६७.५ मिमी (१०१%) पाऊस पडून सरासरी गाठली आहे.

मध्य महाराष्ट्र: सरासरी ३८७.२ मिमी ऐवजी ४८३.४ मिमी (१२५%) असा दमदार पाऊस झाला आहे.

ऑगस्ट महिन्यात विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस जोर धरेल का, याकडे बळीराजाचे लक्ष लागले आहे. (IMD Rain Forecast August Maharashtra)

साताऱ्यातील वाई तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदी पात्रात धोम धरणातून ४,९६६ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.(IMD Rain Forecast August Maharashtra)

धरण पातळी: धोम धरण ८९ टक्के भरले आहे.

वाई येथील प्रसिद्ध ऐतिहासिक महागणपती मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा घातला असून, पाण्याचा फुगवटा थेट मूर्तीपर्यंत पोहोचला आहे. शहरातील सर्व घाट जलमय झाले असून, धोक्याच्या पातळीवरून वाहणाऱ्या पुलांवरून नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. (IMD Rain Forecast August Maharashtra)

देशाच्या पश्चिम सागरी किनारपट्टीवर आजपासून मासेमारीचा हंगाम सुरू झाला आहे. महाराष्ट्रातील मच्छीमारांना १२ सागरी मैल राष्ट्रीय हद्दीत मासेमारीस परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात (किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत) १५ ऑगस्टपर्यंत मासेमारी बंदी कायम राहील. (IMD Rain Forecast August Maharashtra)






मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर