तुकाराम मुंढेंना 'डबल धक्का'! कर्मचाऱ्यांचा बंड, हायकोर्टाची चपराक!


अन्न आणि औषध प्रशासनाचे नवे आयुक्त म्हणून २५ मे रोजी सूत्रे हाती घेताच, आपल्या कडक शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांविरोधात कारवायांचा प्रचंड धडाका लावला! पण... आता याच तुकाराम मुंढेंना एक नव्हे, तर 'डबल धक्का' बसला आहे. एका बाजूला त्यांच्याच प्रयोगशाळेतील २९ कर्मचाऱ्यांनी त्यांच्याविरोधात थेट मंत्र्यांकडे तक्रारीचा पाढा वाचलाय, तर दुसऱ्या बाजूला मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएच्या कारवाईच्या पद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे! नक्की काय आहे हे संपूर्ण प्रकरण? पाहूया या सविस्तर... (Tukaram Mundhe)

छत्रपती संभाजीनगर येथील राज्य अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेतील तब्बल २९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी १५ जुलै रोजी थेट एफडीए मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. (Tukaram Mundhe)

या कर्मचाऱ्यांचे नेमके आक्षेप काय आहेत?

प्रयोगशाळेत अचानक दोन शिफ्ट सुरू करण्याचा निर्णय, मात्र त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नाही. (Tukaram Mundhe)

रिक्त पदे मोठ्या प्रमाणावर असून, विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण. (Tukaram Mundhe)

सकाळी 9 ते रात्री 12 अशा वाढीव वेळेत काम करावे लागत असल्याचा आरोप. (Tukaram Mundhe)

शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही काम करण्याचे आदेश देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी. (Tukaram Mundhe)

वाढलेल्या कामाच्या तुलनेत अतिरिक्त कर्मचारी, तांत्रिक सहाय्यक आणि संसाधने उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत. (Tukaram Mundhe)

अन्न, औषध आणि सौंदर्यप्रसाधनांच्या प्रलंबित नमुन्यांचा निपटारा करण्यासाठी घाई केली जात असून त्यामुळे विश्लेषणाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त. (Tukaram Mundhe)

अन्नाच्या व औषधांच्या प्रलंबित नमुन्यांचा निपटारा करण्यासाठी घाई केली जात असून, भारतीय औषध संहितेनुसार (IP/BP) चाचण्यांना पुरेसा वेळ दिला जात नाहीये. (Tukaram Mundhe)

एका विश्लेषकाकडून दरमहा मर्यादित नमुने तपासले जाऊ शकतात; मात्र त्यापेक्षा जास्त नमुने तपासण्याचा दबाव असल्याचा आरोप. (Tukaram Mundhe)

दोन शिफ्ट सुरू करण्यापूर्वी प्रयोगशाळेची क्षमता, उपकरणे आणि मनुष्यबळ वाढविण्याची मागणी. (Tukaram Mundhe)

पूर्ववत कार्यालयीन वेळ लागू करावी आणि दोन शिफ्टचा निर्णय रद्द करावा, अशी प्रमुख मागणी. (Tukaram Mundhe)

अतिरिक्त कामासाठी योग्य भत्ते व सुविधा देण्याची मागणी. (Tukaram Mundhe)

सतत बदलणारे आदेश आणि कार्यालयीन वेळांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचा आरोप. (Tukaram Mundhe)

प्रयोगशाळेतील विश्लेषणाच्या गुणवत्तेशी तडजोड होऊ नये, यासाठी घाईगडबडीत नमुने निकाली काढू नयेत, अशी मागणी. (Tukaram Mundhe)

तुकाराम मुंढेंच्या शिस्तीची आणि प्रशासकीय कारकिर्दीची चर्चा नवी नाही. (Tukaram Mundhe)

२००५ पासून आतापर्यंत त्यांच्या तब्बल २० पेक्षा जास्त वेळा बदल्या झाल्या आहेत. (Tukaram Mundhe)

कर्मचाऱ्यांच्या नाराजीसोबतच तुकाराम मुंढेंना दुसरा मोठा धक्का बसला तो मुंबई उच्च न्यायालयाकडून! नवी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलचा परवाना एफडीएने रद्द केला होता. याविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने एफडीएच्या कारवाईवर तीव्र ताशेरे ओढले. (Tukaram Mundhe)

केवळ खासगी आस्थापनांवर कठोर कारवाई न करता सरकारी आणि मंत्र्यांच्या मालकीच्या आस्थापनांचीही तपासणी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. मंत्रालय, उच्च न्यायालय तसेच सरकारी आणि निमसरकारी आस्थापनांमधील कँटिनचीही तातडीने पाहणी करून शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नवी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलचा अन्न परवाना रद्द करण्याच्या निर्णयाविरोधातील याचिकेवरील सुनावणीदरम्यान, केवळ एक-दोन झुरळे आढळल्यामुळे थेट परवाना रद्द करणे योग्य नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. (Tukaram Mundhe)

वाद आणि तक्रारी एका बाजूला असल्या तरी, २५ मे रोजी पदभार स्वीकारल्यापासून मुंढेंनी भेसळखोरांचे कंबरडे मोडले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या काही प्रमुख कारवाया म्हणजे, (Tukaram Mundhe)

दूध आणि बनावट पनीरविरोधात मोहीम: राज्यभरात खोट्या आणि रासायनिक दुधावर छापे टाकले. अनेक ठिकाणी हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतून देण्याची वेळ भेसळखोरांवर आली. (Tukaram Mundhe)

गुटखा आणि अमली पदार्थांवर कारवाई: राज्यभरात ९०० पेक्षा जास्त ठिकाणी धाडी टाकून कोट्यवधी रुपयांचा गुटखा जप्त केला. (Tukaram Mundhe)

शाळांमध्ये 'जंक फूड'वर पूर्ण बंदी: शाळांच्या कॅन्टीनमध्ये आणि ५० मीटर परिसरात वडापाव, समोसा, चिप्स, कोल्डड्रिंक्स आणि चॉकलेट्सच्या विक्रीवर तात्काळ बंदी घातली. (Tukaram Mundhe)

पुणे आणि नाशिकमध्ये मोठे छापे: पुण्यात चिक्की, सोनपापडी, काजू-बदाम असा ४५ लाख ५० हजार रुपयांचा संशयित साठा जप्त केला आणि हॉटेल्सचे परवाने निलंबित केले. तसेच नाशिकमध्ये 'सेफ फूड' ऑनलाईन पोर्टलवरून मिळालेल्या तक्रारींवरून ताडी आणि अस्वच्छ हॉटेल्सवर धडक कारवाई केली. (Tukaram Mundhe)

एकीकडे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर धडक कारवाई करणारे तुकाराम मुंढे... तर दुसरीकडे कामाचा अतिताण आणि नियमबाह्य वेळेमुळे नाराज असलेले त्यांचेच कर्मचारी आणि न्यायालयातून मिळालेली चपराक! तुकाराम मुंढेंचा हा 'कडक शिस्तीचा पॅटर्न' जनतेच्या हिताचा आहे की कर्मचाऱ्यांवरील अन्याय? (Tukaram Mundhe)






मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर