मुंबई: (Ladki Bahin Yojana Final List) राज्य सरकारच्या बहुचर्चित 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. ई-केवायसी पडताळणी आणि अर्जांची कडक छाननी पूर्ण झाल्यानंतर महिला व बालविकास विभागाने १ कोटी ६६ लाख पात्र महिलांची अंतिम यादी तयार केली आहे. या प्रक्रियेत अनिवार्य e-KYC न करणे, नियमांत न बसणे किंवा माहिती चुकीची आढळल्याने तब्बल ६६ लाख अर्जदारांना योजनेतून वगळण्यात (अपात्र) आले आहे. (Ladki Bahin Yojana Final List)
e-KYC आणि कडक पडताळणीत ६६ लाख महिला अपात्र
महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना सकोरे-बोर्डीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पडताळणी दरम्यान सरकारी कर्मचारी, आयकर भरणारे, इतर सरकारी योजनांचा दुबार लाभ घेणारे आणि डेटाबेसमध्ये आढळलेले पुरुष अर्जदार या सर्वांना योजनेतून तात्काळ वगळण्यात आले आहे. e-KYC मुळे आता एक पूर्णपणे प्रमाणित आणि पारदर्शक लाभार्थी डेटाबेस तयार झाला असून, भविष्यातील सर्व हप्ते याच यादीनुसार वितरित केले जातील. (Ladki Bahin Yojana Final List)
१.६६ कोटी पात्र महिलांच्या खात्यावर जमा होणार रु. १,५००
छाननीनंतर निश्चित झालेल्या १ कोटी ६६ लाख पात्र महिलांच्या बँक खात्यात आता दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत थेट 'डीबीटी' द्वारे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर जून महिन्याचा हप्ता आधीच जमा करण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (Ladki Bahin Yojana Final List)
विरोधी पक्षांची टीका अन् शासनाचे कडक पाऊल
याआधी अपात्र लाभार्थ्यांना आणि पुरुष अर्जदारांनाही या योजनेचा लाभ मिळत असल्याचे समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. या पार्श्वभूमीवर पारदर्शकता आणण्यासाठी आणि केवळ गरजू व पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी सरकारने तात्काळ e-KYC प्रक्रिया राबवून ही मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे. (Ladki Bahin Yojana Final List)
लाभार्थी यादीत नाव कसे तपासावे?
योजनेच्या अधिकृत पोर्टलला (Official Portal) भेट द्या.
आपला अर्ज क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाका.
ई-केवायसी स्टेटस आणि अंतिम लाभार्थी यादीतील (Beneficiary List) आपले नाव तपासून घ्या.
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.