मुंबई: (Maharashtra Weather Update) राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहाकार उडवला आहे. हवामान खात्याने (IMD) वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, पुढील ३ दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, विदर्भासाठी आज पावसाचा 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहून योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान शास्त्रज्ञांनी केले आहे. (Maharashtra Weather Update)
पुण्यात जुलै महिन्यात रेकॉर्डब्रेक पावसाचा अंदाज
पुण्यातील हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात जुलै महिन्यात विक्रमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवारनंतर पावसाचा जोर ओसरून काही प्रमाणात उघडीप मिळण्याची शक्यता आहे. पुणे घाटमाथ्यासह रायगड जिल्ह्यामध्ये आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)
विविध जिल्ह्यांना दिलेले अलर्ट्स
रेड अलर्ट: विदर्भ विभागातील काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट. (Maharashtra Weather Update)
अतिमुसळधार व विजांचा कडकडाट: पुणे घाटमाथा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, कोल्हापूर घाटमाथा, परभणी, हिंगोली आणि जालना. (Maharashtra Weather Update)
येलो अलर्ट असलेले २१ जिल्हे
मुंबई, ठाणे, पालघर, पुणे (सपाट भाग), सातारा, सोलापूर, सांगली, बीड, अहिल्यानगर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, लातूर, बुलढाणा, अमरावती, अकोला, भंडारा, वर्धा, नागपूर, वाशीम आणि यवतमाळ. (Maharashtra Weather Update)
मराठवाडा अन् उत्तर महाराष्ट्रात शेतकरी चिंतेत
एकीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असली, तरी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भाग अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पुरेशा पावसाअभावी या भागातील शेतकरी चिंतेत सापडले असून, सर्वांचे लक्ष पुढील तीन दिवसांच्या पावसावर लागून राहिले आहे. (Maharashtra Weather Update)