महाराष्ट्रात २९ ते ३१ जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा! पालघर-नाशिकसाठी मुख्यमंत्र्यांचे 'विशेष मदतीचे निर्देश'


मुंबई: (Maharashtra Rain Alert July 29-31) बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात २९ ते ३१ जुलै २०२६ दरम्यान पावसाचा जोर प्रचंड वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या काळात विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, पावसाच्या आणि पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात आढावा बैठक घेऊन पालघर व नाशिक जिल्ह्यांसाठी विशेष पॅकेज आणि 'होल्डिंग पॉन्ड्स'सारख्या कायमस्वरूपी उपाययोजनांचे निर्देश दिले आहेत. (Maharashtra Rain Alert July 29-31)

कोणत्या दिवशी कुठे वाढणार पावसाचा जोर?

२९ जुलै: कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव प्रामुख्याने पूर्व विदर्भात अधिक तीव्र राहील. (Maharashtra Rain Alert July 29-31)

३० जुलै: पावसाची तीव्रता पश्चिम विदर्भ, खानदेश, उत्तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर, कोकण (विशेषतः रायगड, ठाणे, पालघर) आणि मुंबई व मुंबई महानगर प्रदेशात जास्त राहील. (Maharashtra Rain Alert July 29-31)

३१ जुलै: खानदेशातील काही भाग, मुंबई आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात पावसाचा जोर कायम राहील. (Maharashtra Rain Alert July 29-31)

वाऱ्याचा वेग व धोका: विदर्भ, उत्तर मराठवाड्यात वाऱ्याचा वेग वाढेल. सखल भागात पाणी साचणे, नद्यांना पूर येणे आणि घाटात दरड कोसळण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Maharashtra Rain Alert July 29-31)


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीतील प्रमुख निर्णय

पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीचा आढावा घेताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी खालील महत्त्वपूर्ण सूचना केल्या. बाधित कुटुंबांना नियमांतील तरतुदींपेक्षा अधिक मदत देण्यासाठी पालघर आणि नाशिक जिल्ह्यांसाठी एकात्मिक मदत आराखडा तयार करून विशेष पॅकेज दिले जाईल. अतिवृष्टीच्या काळात वसई-विरारमध्ये पाण्याचा जलद निचरा होण्यासाठी मुदत संपलेल्या लीजवरील जागांचा वापर करून 'होल्डिंग पॉन्ड्स' विकसित केले जातील. (Maharashtra Rain Alert July 29-31)

रायगड व रत्नागिरीच्या धर्तीवर पालघरसाठी 'महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम' (MRDP) अंतर्गत आराखडा तयार केला जाईल, ज्यामुळे जागतिक बँकेचा निधी मिळवणे सोपे होईल. रस्ते दळणवळण युद्धपातळीवर पूर्ववत करणे, महावितरणने वीज यंत्रणेचे 'इन्फ्रास्ट्रक्चरल अपग्रेडेशन' करून आपत्तीतही अखंडित वीज पुरवणे, आणि संपूर्ण जिल्ह्याचे जिओ-मॅपिंग करून विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. (Maharashtra Rain Alert July 29-31)






मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर