शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजने'ची तिसरी यादी जाहीर; १६.९६ लाख शेतकऱ्यांना १३ हजार कोटींची कर्जमाफी!


मुंबई: (Farmer Loan Waiver Scheme 3rd List) महाराष्ट्र शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत पात्र शेतकरी बांधवांची तिसरी अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. या नव्या यादीमध्ये राज्यातील १६ लाख ९६ हजार शेतकरी कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे. या पात्र शेतकऱ्यांना सुमारे १३ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार असल्याची माहिती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. योजनेतील उर्वरित पात्र लाभार्थ्यांच्या याद्याही येत्या काही दिवसांत टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. (Farmer Loan Waiver Scheme 3rd List)
 
आधार प्रमाणीकरण अन् थकीत रक्कम थेट खात्यात! 
 
सहकारमंत्र्यांनी योजनेच्या अंमलबजावणीविषयी आणि बँक खात्यात निधी जमा होण्याच्या प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली. पात्र लाभार्थ्यांची यादी 'महाआयटी'ने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून प्राथमिक पडताळणी पूर्ण झाली आहे. पुढील आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएस पाठवले जात आहेत. योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी प्रत्येक पात्र लाभार्थ्याला एक 'विशिष्ट ओळख क्रमांक' देण्यात येत आहे. अॅग्रीस्टॅकवरील नोंदणी आणि बायोमेट्रिक/आधार प्रमाणीकरण पूर्ण होताच, 'थेट लाभ हस्तांतर' प्रणालीद्वारे कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक/कर्ज खात्यात विनाविलंब जमा केली जाईल. (Farmer Loan Waiver Scheme 3rd List)
 
शेतकरी बांधवांच्या सोयीसाठी राज्य सरकारने विविध पातळ्यांवर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. राज्यातील सुमारे ३२ हजार 'आपले सरकार सेवा केंद्रां'मध्ये जाऊन शेतकरी आपले प्रमाणीकरण पूर्ण करू शकतात. ग्रामपंचायत कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था (VKSS) आणि संबंधित बँकांच्या शाखांच्या सूचना फलकांवरही लाभार्थ्यांच्या याद्या पाहण्यासाठी उपलब्ध राहतील. (Farmer Loan Waiver Scheme 3rd List)
 
राज्यातील ५६ लाख शेतकरी कुटुंबांना मिळणार लाभ!
 
एकूण योजना आणि तिच्या व्याप्तीबाबत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, "या संपूर्ण योजनेचा थेट फायदा राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकरी कुटुंबांना होणार आहे. सध्या १७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात १३ हजार कोटी जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी नाहीत आणि प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे, त्यांच्या खात्यावर रक्कम तात्काळ वर्ग होईल. उर्वरित थकीत कर्जदार शेतकऱ्यांच्या माहितीची पडताळणी सुरू असून पुढील याद्या लवकरच प्रसिद्ध केल्या जातील." (Farmer Loan Waiver Scheme 3rd List)
 

 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर