खासदार पार्थ पवार यांच्या विवाहाची तारीख ठरली! 'या' दिवशी होणार साखरपुडा; 'कायनात दारा' होणार पवार कुटुंबाची नवी सून

 
Parth Pawar Wedding Date
 
बारामती: (Parth Pawar Wedding Date) राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ अजित पवार यांच्या विवाहाबाबत सुरू असलेल्या विविध चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी गुरुवारी २३ जुलै रोजी पत्रकार परिषदेत पार्थ पवार यांच्या साखरपुड्याची आणि विवाहाची अधिकृत तारीख जाहीर केली आहे. पार्थ पवार यांचा साखरपुडा २९ जुलै २०२६ रोजी अत्यंत साध्या कौटुंबिक वातावरणात पार पडणार असून, २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. (Parth Pawar Wedding Date)
 
यासोबतच, पार्थ पवार यांची होणारी पत्नी कायनात दारा यांची कौटुंबिक, शैक्षणिक व व्यावसायिक पार्श्वभूमी जाहीर करत माध्यमांमध्ये पसरलेल्या सर्व अफवांना पूर्णविराम देण्यात आला आहे. (Parth Pawar Wedding Date)
 
कोण आहेत पार्थ पवार यांच्या होणाऱ्या पत्नी कायनात दारा?
 
उमेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्थ पवार यांच्या होणाऱ्या पत्नीबाबत अनेक माध्यमांत चुकीची माहिती प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे संभ्रम दूर करण्यासाठी त्यांची अधिकृत माहिती खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे. (Parth Pawar Wedding Date)
 
नाव व मूळ निवासी: कु. कायनात दारा. त्या मूळच्या चंदीगड येथील असून सध्या दिल्लीत वास्तव्यास आहेत. (Parth Pawar Wedding Date)
 
कौटुंबिक पार्श्वभूमी: त्या पंजाबी हिंदू (कश्यप गोत्र) कुटुंबातील आहेत. (Parth Pawar Wedding Date)
 
शालेय शिक्षण: 'द ब्रिटिश स्कूल', चाणक्यपुरी, नवी दिल्ली. (Parth Pawar Wedding Date)
 
उच्च शिक्षण: जगप्रसिद्ध 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स' (LSE), लंडन येथून त्यांनी 'आंतरराष्ट्रीय संबंध' विषयात प्रथम श्रेणीसह B.Sc. पदवी पूर्ण केली आहे. (Parth Pawar Wedding Date)
 
कारकीर्द व व्यवसाय: शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी 'NDTV 24x7' या इंग्रजी वृत्तवाहिनीत रिपोर्टर आणि आऊटपुट एडिटर म्हणून काम केले आहे. सध्या त्या आपल्या कौटुंबिक हॉस्पिटॅलिटी आणि रिअल इस्टेट व्यवसायात कार्यरत आहेत. (Parth Pawar Wedding Date)
 
उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या निधनानंतर कुटुंबात विवाह कधी करावा, यावरून समाजात अनेक धार्मिक गैरसमज पसरले होते. यावर बोलताना उमेश पाटील यांनी करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्याशी झालेल्या चर्चेचा संदर्भ दिला. (Parth Pawar Wedding Date)
 
"समाजात अशी एक समजूत आहे की, आई किंवा वडिलांचे निधन झाल्यास कुटुंबातील विवाह एका वर्षाच्या आतच करावा लागतो, अन्यथा पुढील तीन वर्षे विवाह करता येत नाही. यावर धर्मशास्त्रातील योग्य परंपरा जाणून घेण्यासाठी करवीर पीठाच्या शंकराचार्यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. शंकराचार्यांनी स्पष्ट केले की, पालकांच्या निधनानंतर सर्व धार्मिक विधी व कर्मकांड पूर्ण करणे आवश्यक असते; परंतु एका वर्षाच्या आतच विवाह उरकावा असा कोणताही कठोर नियम धर्मशास्त्रात नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही गैरसमजाला बळी पडू नये." (Parth Pawar Wedding Date)
 
बारामतीत रंगणार शाही विवाहसोहळा
 
साखरपुडा: २९ जुलै २०२६ रोजी केवळ जवळचे कुटुंबीय आणि निमंत्रित पाहुण्यांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने साखरपुडा पार पडेल.
 
विवाहसोहळा: २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे मोठ्या थाटामाटात हा विवाह पार पडणार आहे.
 
नवा प्रवास: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सून आणि खासदार पार्थ पवार यांची जीवनसाथी म्हणून कायनात दारा सार्वजनिक जीवनात प्रवेश करत आहेत. त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अनुभवाचा सामाजिक कार्यासाठी मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. (Parth Pawar Wedding Date)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर