कोणत्याही पक्षाला आंधळेपणाने पाठिंबा देऊ नका, 'ट्रेंड'...!; 'सीजेपी' आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या लेकीची इंस्टा स्टोरी; नेमकं काय म्हणाली?



 
Divija Fadnavis Insta Story
 
मुंबई: (Divija Fadnavis Insta Story) 'नीट' पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) संसदेवरील मोर्चानंतर आता या आंदोलनाचे पडसाद सर्वच स्तरांत उमटत आहेत. एकीकडे रस्त्यापासून संसदेपर्यंत विरोधाची धार तीव्र झाली असताना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कन्या दिविजा फडणवीस हिने सोशल मीडियावरून या आंदोलनावर आणि राजकीय समीकरणांवर अत्यंत परखड मत व्यक्त केले आहे. "केवळ 'ट्रेंड' आहे म्हणून बंड करू नका; शैक्षणिक सुधारणांना पाठिंबा द्या, पण राजकीय पक्षांना आंधळेपणाने समर्थन देणे टाळा," असा महत्त्वपूर्ण सल्ला दिविजा फडणवीस यांनी तरुणांना दिला आहे. (Divija Fadnavis Insta Story)
 
जंतर-मंतर आणि पार्लमेंट स्ट्रीटवर आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर दिविजाने हिंसाचाराचा निषेध केला आहे. "मला या आंदोलनावर भाष्य करण्यासाठी अनेकदा विचारले गेले. त्यावर मी इतकेच म्हणेन की, लोकशाहीत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. मात्र, आंदोलकांकडून पोलिसांवर होणारी हिंसा आणि पोलिसांकडून आंदोलकांवर होणारा बळप्रयोग, या दोन्ही गोष्टींना लोकशाहीत परवानगी मिळता कामा नये." (Divija Fadnavis Insta Story)
 
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा राजकीय व धार्मिक गैरवापर होऊ नये, असा स्पष्ट इशारा देताना दिविजा म्हणाली. "जोपर्यंत विद्यार्थ्यांचे हित, 'नीट', पेपरफुटी आणि 'एनटीए' (NTA) या मूळ मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे, तोपर्यंत सर्व काही ठीक आहे. मात्र, ज्या क्षणी ही आंदोलने धर्माच्या दिशेने वळतात किंवा मूळ कक्षेबाहेर जातात, तेव्हा त्यामागचा खरा उद्देश बदलतो. याबद्दल प्रत्येकाने सावध राहिले पाहिजे." (Divija Fadnavis Insta Story)
 
"सोशल मीडियावर चर्चेत येणाऱ्या कोणत्याही गोष्टीचे आंधळेपणाने समर्थन करू नका. केवळ 'ट्रेंड' होत आहे म्हणून बंड करू नका किंवा कोणत्याही राजकीय विचारसरणीच्या प्रभावाखाली येऊन स्वतःचे मत बनवू नका." (Divija Fadnavis Insta Story)
 
"लोकशाहीत विरोधी पक्षाने देशाचे हित डोळ्यांसमोर ठेवून आणि विकासाचे उच्च ध्येय साध्य करण्यासाठी सत्ताधारी पक्षाला अधिक चांगले निर्णय घेण्यास मदत केली पाहिजे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचा शत्रू बनून फक्त त्यांची बदनामी करण्याचे राजकारण करू नये." (Divija Fadnavis Insta Story)
 

 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर