मुंबई: (Maharashtra Rain Forecast) गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा एकदा जोरदार सक्रिय होणार आहे. पूर्व मध्य प्रदेशातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त जोरदार वाऱ्यांमुळे पुढील ४ ते ५ दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पालघर जिल्ह्यात वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ६० किमी राहण्याची शक्यता असून, पालघर आणि नाशिकच्या घाट क्षेत्रात पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Rain Forecast)
हवामान अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जुलैपासून पश्चिम किनारपट्टीवर पावसाचा जोर कमालीचा वाढणार आहे. मुंबई, ठाणे व पालघरमध्ये २२ जुलै रोजी ताशी ४० ते ६० किमी वेगाने वारे वाहतील. पालघर जिल्हा आणि शहापूर तालुक्यात बुधवारी दुपारी १२ ते गुरुवारी दुपारी ३ दरम्यान अत्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो, ज्यामुळे सखल भागांत पाणी साचून पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या घाट भागात बुधवार आणि गुरुवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Rain Forecast)
पुढील ३ दिवसांचा विभागीय पावसाचा अंदाज (Maharashtra Rain Forecast)
पालघर, शहापूर, नाशिक घाट
संभाव्य पाऊस (मिमी)- ३०० ते ४०० मिमी (काही ठिकाणी ५०० मिमी)
पावसाचे स्वरूप- अतिमुसळधार ते मुसळधार
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली
संभाव्य पाऊस (मिमी)- २०० ते ३०० मिमी
पावसाचे स्वरूप- जोरदार वारे अन् मुसळधार सरी
विदर्भ व उत्तर महाराष्ट्र
संभाव्य पाऊस (मिमी)- ८० ते १८० मिमी
पावसाचे स्वरूप- मध्यम ते मुसळधार पाऊस
दक्षिण कोकण व गोवा
संभाव्य पाऊस (मिमी)- रत्नागिरी, सिंधुदुर्गात मध्यम
पावसाचे स्वरूप- गोव्यात हलक्या ते मध्यम सरी
पुणे शहर व मराठवाडा
संभाव्य पाऊस (मिमी)- हलक्या ते मध्यम सरी
पावसाचे स्वरूप- विश्रांतीनंतर हलका पाऊस
मुंबईकरांची चिंता मिटणार; 'तानसा' धरण भरून वाहण्याची शक्यता!
या मुसळधार पावसामुळे मुंबई आणि ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाणीसाठ्यात मोठी वाढ होणार आहे. या काळात तानसा धरण पूर्ण भरून ओसंडून वाहण्याची शक्यता आहे. मोडक सागर आणि भातसा धरणातील पाणीसाठा ८ ते १२ टक्क्यांनी वाढू शकतो. अपर वैतरणा धरणात १२ ते १८ टक्के, तर पालघरमधील सूर्या धरणात २० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा वाढण्याचा अंदाज आहे. (Maharashtra Rain Forecast)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.