नागपूर (Devendra Fadnavis Diwali with Farmers) : राज्यात यंदा दुष्काळाचे गंभीर संकट निर्माण झाले असून, शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसोबत साजरी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा या गावाला भेट देत शेतकरी कुटुंबासोबत दिवाळीचा सण साजरा केला. विशेष म्हणजे, त्यांनी शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्कामही केला. मुख्यमंत्र्यांच्या या उपक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले आहे.
शेतकरी कुटुंबासोबत मुख्यमंत्र्यांची दिवाळी!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी रात्री लोहारी सावंगा गावात दाखल झाले. यावेळी गावकऱ्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. त्यांनी सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मंदिरात जाऊन सामूहिक प्रार्थनेत सहभाग घेतला. त्यानंतर स्थानिक शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी भेट दिली. (Devendra Fadnavis Diwali with Farmers)
यावेळी फडणवीस यांनी बालपांडे कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या शेतीविषयक अडचणी जाणून घेतल्या. तसेच कुटुंबासोबत पारंपरिक महाराष्ट्रीयन भोजनाचाही आस्वाद घेतला. मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कुटुंबासोबत वेळ घालवत त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा!
लोहारी सावंगा गावात शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करताना फडणवीस यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यंदा अपुऱ्या पावसामुळे कापूस, सोयाबीन आणि तूर यांसारख्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर सिंचन, पाणीटंचाई आणि आर्थिक अडचणींचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. (Devendra Fadnavis Diwali with Farmers)
गावातील नागरिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी शेतीचे प्रश्न, पीक परिस्थिती आणि स्थानिक समस्यांवर चर्चा केली. दुष्काळावर तातडीने संपूर्ण उपाय करणे शक्य नसले, तरी शेतकऱ्यांना सरकारकडून शक्य ती सर्व मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
बोअरवेल खोदण्यास विशेष परवानगी ; मुख्यमंत्र्यांची घोषणा
राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर फळबागा वाचवण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्या भागांमध्ये शेतकऱ्यांच्या फळबागा आहेत, अशा ठिकाणी बोअरवेल खोदकामावरील बंदीत १५ डिसेंबरपर्यंत विशेष सवलत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. (Devendra Fadnavis Diwali with Farmers)
फळबागा उभ्या राहण्यासाठी आणि त्यांना उत्पादन सुरू होण्यासाठी १० ते १२ वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे पाणीटंचाईमुळे या बागा सुकल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. मे महिन्यापर्यंत फळबागांना पाणी उपलब्ध करून देऊन त्या जिवंत ठेवणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, राज्यातील बोअरवेल खोदकामावरील सरसकट बंदी उठवण्यात आलेली नाही. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष फळबागा आहेत, अशाच भागांमध्ये १५ डिसेंबरपर्यंत विशेष बाब म्हणून बोअरवेल खोदण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच बोअरवेल फ्लशिंगवर कोणतीही बंदी नसून, जुन्या बोअरवेलचे खोलीकरण करण्यासाठी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. (Devendra Fadnavis Diwali with Farmers)
या निर्णयामुळे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः संत्रा, मोसंबी यांसारख्या दीर्घकालीन फळपिकांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सिंचन प्रकल्पांसाठी १५ हजार कोटींचे कर्ज; विदर्भ-मराठवाड्याला दिलासा!
राज्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार १५ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्यातील ९७ सिंचन प्रकल्प आधीच पूर्ण झाले असून, उर्वरित प्रकल्पांची कामेही अंतिम टप्प्यात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील लहान सिंचन प्रकल्पांना या निधीचा मोठा फायदा होणार आहे. (Devendra Fadnavis Diwali with Farmers)
शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्यप्राण्यांपासून होणारे नुकसान रोखण्यासाठी सौर कुंपण योजनेचा विस्तार करण्याचे संकेतही देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जंगलालगतच्या शेतजमिनींना प्राधान्य देऊन जंगलाच्या सीमेवर सौर कुंपण उभारण्याचा सरकारचा विचार आहे. यामुळे वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण होण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळता येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून फडणवीसांच्या कृतीचे कौतुक!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या उपक्रमाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दखल घेतली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत मोदी यांनी त्यांच्या कृतीचे कौतुक केले. (Devendra Fadnavis Diwali with Farmers)
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणे आणि अरुणाबाई व रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्काम करणे ही मनाला स्पर्श करणारी कृती असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले. तसेच, यातून महाराष्ट्रातील एनडीए सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी संवेदनशीलतेने काम करत असल्याचे दिसून येते, असेही त्यांनी नमूद केले. (Devendra Fadnavis Diwali with Farmers)
मंत्र्यांनाही शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याचे आवाहन!
राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता प्रत्येक मंत्र्याने किमान एक दिवस एखाद्या गावात जाऊन शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले होते. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना सरकार त्यांच्या पाठीशी असल्याची जाणीव व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एकीकडे दिवाळीचा उत्साह आणि दुसरीकडे दुष्काळामुळे चिंतेत असलेला बळीराजा, अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी थेट शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. त्यामुळे फडणवीस यांचा हा दौरा सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. (Devendra Fadnavis Diwali with Farmers)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.