‘तुम्हाला फरक पडत नसेल, पण आम्हाला पडतो!’; इंदू मिल स्मारकाच्या कामावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अधिकाऱ्यांना फटकारे!


मुंबई (Indu Mill Ambedkar Memorial) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील इंदू मिल स्मारकाच्या कामातील दिरंगाईवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. स्मारकाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण होत नसल्याने मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘तुम्हाला फरक पडत नसेल, पण आम्हाला फरक पडतो,’ अशा शब्दांत त्यांनी कंत्राटदारांना सुनावले. तसेच, यापुढे कामात कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचा स्पष्ट इशाराही दिला.

कामाच्या संथ गतीवर मुख्यमंत्र्यांची नाराजी

इंदू मिल स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह शापूरजी पालनजी कंपनीच्या प्रतिनिधींना धारेवर धरले. प्रत्येक बैठकीला वेगवेगळे प्रतिनिधी पाठवून वेळकाढूपणा करू नका. कामातील अडचणी सांगण्याऐवजी त्यावर ठोस निर्णय घ्या आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निश्चित कालमर्यादा द्या, असे त्यांनी बजावले. तसेच, स्मारकाच्या कामाचे सुधारित वेळापत्रक सादर करण्याचे निर्देशही दिले. (Indu Mill Ambedkar Memorial)

स्मारकाच्या कामातील विलंब लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (MMRDA) प्रकल्पाच्या कामावर दररोज लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कंत्राटदाराने कामाचा वेग वाढवला नाही, तर दुसऱ्या कंपनीची नियुक्ती करण्याबाबतही विचार केला जाऊ शकतो, असा इशारा सरकारकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात स्मारकाच्या कामाला कितपत वेग येतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.(Indu Mill Ambedkar Memorial)





कांस्याच्या दरवाढीमुळे पुतळ्याचे काम रखडले?

स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुख्य पुतळ्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून रखडल्याची माहिती समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तांबे आणि कांस्याच्या किमती वाढल्यामुळे पुतळ्याच्या निर्मितीचा खर्च वाढल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर कंत्राटदाराकडून सुमारे ३५० कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, आर्थिक मागण्यांची तपासणी केली जाईल; परंतु त्यासाठी प्रकल्पाचे काम थांबवता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. (Indu Mill Ambedkar Memorial)

४५० फुटांचे भव्य स्मारक उभारण्याचे नियोजन

मुंबईतील दादर येथील इंदू मिल परिसरात सुमारे साडेबारा एकर जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकात बाबासाहेबांचा ३५० फूट उंच कांस्य पुतळा आणि १०० फुटांचे पादपीठ असे मिळून एकूण ४५० फुटांची भव्य वास्तू साकारली जाणार आहे. याशिवाय संग्रहालय, ग्रंथालय, संशोधन केंद्र, ध्यान केंद्र, सभागृह आणि प्रदर्शन दालनांचाही समावेश असणार आहे.

अनेक वर्षांचा संघर्ष; स्मारकाच्या पूर्णत्वाची प्रतीक्षा

इंदू मिलची जागा स्मारकासाठी मिळावण्यासाठी आंबेडकरी चळवळीने अनेक वर्षे संघर्ष केला. डिसेंबर २०१२ मध्ये केंद्र सरकारने या जागेच्या हस्तांतरणाला तत्त्वतः मान्यता दिली. त्यानंतर ११ ऑक्टोबर २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. २०१८ मध्ये शापूरजी पालनजी कंपनीला बांधकामाचे कंत्राट देण्यात आले. मात्र, पुतळ्याच्या उंचीत बदल, कोरोना महामारी आणि आर्थिक कारणांमुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला वारंवार विलंब झाला.

आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या अल्टिमेटमनंतर तरी इंदू मिल स्मारकाच्या कामाला वेग येणार का आणि आंबेडकरी समाजाचे अनेक वर्षांचे स्वप्न कधी पूर्ण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Indu Mill Ambedkar Memorial)




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर