बुडते जहाज वाचवण्यासाठी काँग्रेसची धडपड! परिसीमन विधेयकावरून स्टॅलिन-पवारांची भेट घेणार सोनिया-राहुल गांधी!

 
 Congress Delimitation Bill Opposition
 
नवी दिल्ली (Congress Delimitation Bill Opposition) : केंद्र सरकारच्या प्रस्तावित परिसीमन विधेयकाला विरोध करण्यासाठी काँग्रेसने आता जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. विधेयकाच्या समर्थनार्थ राजकीय पक्षांची संख्या वाढत असताना विरोधकांच्या बाजूने संख्याबळ कमी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे काँग्रेसने दक्षिण भारतातील महत्त्वाचा प्रादेशिक पक्ष असलेल्या द्रमुकला विधेयकाला पाठिंबा देण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे रविवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी चेन्नई येथे द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांची भेट घेणार आहेत.
 
ही भेट स्टॅलिन यांच्या निवासस्थानी होणार असून, परिसीमन विधेयकावर द्रमुकने घेतलेली भूमिका बदलावी, यासाठी काँग्रेस नेते त्यांची मनधरणी करण्याची शक्यता आहे. (Congress Delimitation Bill Opposition)
 
द्रमुकची भूमिका बदलण्याची शक्यता कमी
 
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, काँग्रेस नेत्यांनी रविवारी दुपारी स्टॅलिन यांच्या भेटीसाठी वेळ मागितला होता. द्रमुकच्या एका नेत्याने स्टॅलिन भेटीसाठी तयार असल्याचे सांगितले.ते म्हणाले, "आता आम्ही विधेयकाला पाठिंबा देण्याचे ठरवले आहे, त्यामुळे त्यात बदल करणे अवघड आहे. तसेही, जेव्हा त्यांचे मंत्री अजूनही जोसेफ विजय यांच्या सरकारमध्ये आहेत, तेव्हा काँग्रेस आम्हाला बदल्यात काय देऊ शकते?" (Congress Delimitation Bill Opposition)
 
राहुल गांधींकडून स्टॅलिन यांना ‘भाऊ’ संबोधन
 
स्टॅलिन यांच्या भेटीपूर्वी राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत द्रमुकला परिसीमनाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकांचा विरोध करण्याचे आवाहन केले. लोकसभेतील जागांची संख्या ८५० पर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावामुळे देशातील लोकशाही धोक्यात येईल, असा दावा त्यांनी केला. (Congress Delimitation Bill Opposition)
 
पोस्टच्या शेवटी त्यांनी स्टॅलिन यांना ‘भाऊ’ संबोधत तमिळविरोधी शक्तींविरोधात ते नेहमी खंबीरपणे उभे राहिले असल्याचे सांगितले. राष्ट्रीय हित, तमिळनाडूचे हित आणि संविधानाच्या रक्षणासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन हे विधेयक रोखले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
 
द्रमुकच्या दोन्ही मागण्या मान्य झाल्याचा दावा
 
यापूर्वी शुक्रवारी द्रमुकने दोन प्रमुख अटींसह परिसीमन विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला होता. पहिल्या अटीनुसार, सर्व राज्यांच्या लोकसभा जागांमध्ये प्रमाणबद्ध वाढ करण्यात यावी, अशी पक्षाची मागणी होती. तर दुसऱ्या अटीनुसार, पुढील २५ वर्षांसाठी परिसीमन करताना १९७१ च्या जनगणनेचा आधार कायम ठेवण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. (Congress Delimitation Bill Opposition)
 
केंद्र सरकार या मागण्या मान्य करण्यास तयार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे द्रमुकची भूमिका काँग्रेससाठी अडचणीची ठरत असून, विरोधी पक्षांच्या संख्याबळावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. (Congress Delimitation Bill Opposition)

शरद पवारांचीही काँग्रेस नेते घेणार भेट
 
स्टॅलिन यांच्यासोबतच्या बैठकीनंतर काँग्रेसचे तीनही वरिष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार असल्याची माहिती आहे. परिसीमन विधेयकाला विरोध करण्यासाठी त्यांचा पाठिंबा मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल.
 
या बैठकांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासह ‘इंडिया’ आघाडीतील अन्य काही नेतेही सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे परिसीमन विधेयकावरून विरोधकांची एकजूट टिकवण्यासाठी काँग्रेसची धडपड सुरू असल्याचे चित्र आहे. (Congress Delimitation Bill Opposition)




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर